Header Ads

नमो गजानना नमो हनुमंता Lyrics | Namo Gajanna Namo Hanumanta



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये नमो गजानना नमो हनुमंता Lyrics बघणार आहोत.
________________

🌸नमो गजानना नमो हनुमंता Lyrics🌸

नमो गजानना नमो हनुमंता
दोघात दोन देवा कोण बलवंता || धृ ||

गजानन म्हणे मी रिद्धी सिद्धी भारी
हनुमान म्हणे मी बाळ ब्रह्मचारी
नमो गजानना नमो हनुमंता,.. || 1 ||

गजानन म्हणे माझ्या जानव्याचा जोडा
हनुमंत म्हणे माझ्या पायामध्ये तोडा
नमो गजानना नमो हनुमंता... || 2 ||

गजानन म्हणे मी सिंहगड पाहिला
हनुमंत म्हणे लंकागडश्र जाळीला
नमो गजानना नमो हनुमंता  || 3||

गजानन म्हणे माझ्या नैवेद्याची लाडू
हनुमंत म्हणे मला तेलाचा गंडू
नमो गजानना नमो हनुमंता || 4 ||

गजानन म्हणे मी शिवाचा बच्चा
हनुमंत म्हणे मी रामाचा शिष्य
नमो गजानना नमो हनुमंता  || 5 ||

रामदास म्हणे मी कोणाला मानू
दोघांमध्ये देव आहे सारखेच जाणू
नमो गजानना नमो हनुमंता  || 6 ||

नमो गजानना नमो हनुमंता
दोघात दोन देवा कोण बलवंता ||

* * * * *
________________


✅ हे गीत पण नक्की वाचा👇👇👇
________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण नमो गजानना नमो हनुमंता Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.