-->

Header Ads

एक होती अळी बालगीत Lyrics | Ek Hoti Ali Baalgeet


नमस्कार या पोस्टमध्ये आपण एक होती अळी बालगीत Lyrics बघणार आहोत.

___________________

🐛एक होती अळी बालगीत Lyrics🐛

मटारची शेंग हिरवीगार..
आत राहायचे दाणे चार

गोल गोल दाणे पिटुकले
एकमेकांना बिलगले...

एकदा काय गंमत झाली
इवलीशी अळी आत डोकावली ‌‌..

म्हणाली तुमच्यात घ्या ना मला पण
मिळून राहू आपण सारे जण...

मटार दाण्यांनी उडवले खांदे ‌...
तिथेच खरे झाले ना वांदे..

अळी आली मग सरसावून
झक्कास बसली वेटोळे घालून..

बघता बघता झाली टम्म...
गाणे बिचारी एकदम सुम्म..

सयू होती मटार सोलीत
मध्येच दाणे तोंडात टाकीत ‌‌...

उघडता शेंग फुटली किंकाळी.‌.
टकामका पाहे तिच्याकडे अळी...

घाबरगुंडी उडाली खरी.‌.‌
अळी पोहोचली आता नव्या घरी...
अळी पोहोचली आता नव्या घरी...

* * * * * 
___________________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇

___________________

👀आज या पोस्टमध्ये आपण एक होती अळी बालगीत Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!

___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents