किती ओढू रवीचा दोर गवळण Lyrics | Janabai Gavlan Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण किती ओढू रवीचा दोर गवळण Lyrics बघणार आहोत.
__________________
🌷किती ओढू रवीचा दोर गवळण Lyrics🌷
किती ओढू रवीचा दोरा फिरतीया गरगर
लोणी आल्यानं आल्यानं
सार ग यांन खाल्लय वरच्यावर || धृ ||
पहाटे उठून मी लवकर केला
सडा सारवण सारं
लोणी आल्यानं आल्यानं
सार ग यांन खाल्लय वरच्यावर || १ ||
सासुबाई च पडलय कोड
याने खाल्लय वरच्यावर
घुसळिता तांबड फुटलं
लोणी आल्यानं आल्यानं
सार ग यांन खाल्लय वरच्यावर || २ ||
दिवस उगवून आलाय वर
दार उघडून बघते घर
डेऱ्या मागं लपलाय चोर
लोणी आल्यानं आल्यानं
सार ग यांन खाल्लय वरच्यावर || ३ ||
जनी म्हणे नंदकिशोर
याने थकविले लहानथोर
राधा विनविते जोडूनी कर
याने खाल्लय वरच्यावर...
लोणी आल्यानं आल्यानं
सार ग यांन खाल्लय वरच्यावर || ४ ||
* * * * *
__________________
✅या गवळणी पण नक्की वाचा👇👇👇
__________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण किती ओढू रवीचा दोर गवळण Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
__________________
Post a Comment