Header Ads

कान्हा पुरे हा धिंगाणा गवळण Lyrics | Kanha Pure Ha Dhingana Gavlan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कान्हा पुरे हा धिंगाणा गवळण Lyrics बघणार आहोत.

___________________________

🍁कान्हा पुरे हा धिंगाणा गवळण Lyrics | Marathi 🍁

गवळ्याची पोर मी परक्याची नार मी
नादी माझ्या लागू नको...
किती तुला सांगू मी किती समजाऊ
खोड माझी काढू नको...
कान्हा कान्हा पुरे हा रे धिंगाणा..
भलतं मागू नको... || धृ ||

ननंद माझी खट्याळ भारी
चुगल्या करी घरोघरी
पतीचा तो राग भारी रागावेल माझ्यावरी
गोकुळच्या त्या नर नारी चर्चा करती घरोघरी
वेड्यापरी वागू नको कान्हा..
वेड्या परी वागू नको..
कान्हा कान्हा पुरे हा रे धिंगाणा..|| १ ||

मध्यरात्री मागील दारी
चोरावानी घुसतो घरी
खिडकी तोडी मटकी फोडी
दही दूध चोरी करी.. चाळे करी पोरापरी
नजर नाही याची बरी..
काय सांगू आता याला रीत नाही याची बरी
वेशीला टांगू नको...
लाज वेशीला टांगू नको..
कान्हा कान्हा पुरे हा रे धिंगाणा..|| २ ||

कसं याला समजावून काही मला समजेना
अगं यशोदे बाई तुझा कान्हा ऐकेना
कारण काही नसताना खोड्या करी हा कान्हा
पुरे झाले चाळे कान्हा विनविते मी पुन्हा पुन्हा
वाकडा टाकू नको..
पाय वाकडा टाकू नको...
कान्हा कान्हा पुरे हा रे धिंगाणा..|| ३ ||

* * * * * * *
___________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
___________________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण कान्हा पुरे हा धिंगाणा गवळण Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!
___________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.