Header Ads

राधे राधे हाका मारितो तुला Lyrics | Radhe Radhe Haka Marito Tula Gavlan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण राधे राधे हाका मारितो तुला Lyrics बघणार आहोत.
_________________________

🌸राधे राधे हाका मारितो तुला Lyrics🌸

राधे राधे हाका मारितो तुला
तुझा गोरा रंग पटला मला
आता मी नेणार माझ्या गोकुळाला || धृ ||

कान्हा चारीत होता गायी
राधा पाण्याला गेली घाई घाई
राधा हसली मनी लाजली
आता हसली मनी लाजली
आता मी नेणार माझ्या गोकुळाला || १ ||

कान्हा वाजवीत होता पावा
राधा करी ती कृष्णाचा भावा
राधा लाजली मनी हासली
आता मी नेणार माझ्या गोकुळाला || २ ||

एका जनार्दनी राधा
राधा लागली कृष्णाच्या नादा
राधा लाजली मनी हासली
राधे राधे हाका मारितो तुला
आता मी नेणार माझ्या गोकुळाला || ३ ||

* * * * * * *
_________________________


✅हि भक्तीगीते पण नक्की वाचा 👇👇👇
_________________________

तर आज या पोस्ट यामध्ये आपण राधे राधे हाका मारितो तुला Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
_________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.