हाय लय गुणाची अंबा मोठ्या मनाची Lyrics | Ambabai Bhkatigeet Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण हाय लय गुणाची अंबा मोठ्या मनाची Lyrics बघणार आहोत.
_________________
हाय लय गुणाची अंबा मोठ्या मनाची Lyrics
अंबिका चंडिका रेणुका कालिका
हाय लय गुणाची...
हाय लय गुणाची अंबा मोठ्या मनाची... || धृ ||
रूप आईच लाखात छान
नाकात नथनी मुखात पान
हसरी लाजरी दिसते साजरी
खान ही रत्नाची.. हाय लय गुणाची
अंबा मोठ्या मनाची... || 1 ||
चैत्र पुनवेची चांदणी रात
भक्ताच्या मेळ्यात खेळती पोत
गाई गुणगुण पायी रुणुझुण
साद येते पैंजणाची.. हाय लय गुणाची
अंबा मोठ्या मनाची... || 2 ||
वाऱ्या वाणी धावे भक्तांचा थवा
लाख दुःखाची देते ती दवा
धरी छाया हीच आदिमाया
माता माऊली दिनाची.. हाय लय गुणाची
अंबा मोठ्या मनाची... || 3 ||
_________________
✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
_________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण हाय लय गुणाची अंबा मोठ्या मनाची Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
_________________
Post a Comment