Header Ads

अग अग राधे गवळण गीत Lyrics | Aga Aga Radhe Gavlan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण अग अग राधे गवळण गीत Lyrics बघणार आहोत.


सॉंग - सांग अग राधे
लिरिक्स - गोपाळ करंडे
सिंगर - एकनाथ डिके

________________

अग अग राधे गवळण गीत Lyrics

मनात तू माझ्या ध्यानात तू..
बसलीस राधे...
श्वासात तू हृदयात तू.. बसलीस राधे..
प्रेमभावे नजरेत मला तू दिसलीस राधे....
छेडीता सूर बासरीचे...

अगं अगं राधे किती प्रेम करशील
तुझ्या या कान्हावर...
तुझ्या न माझ्या प्रेमाची ओंजळ..
रिती ही जन्मभर..
माझ्या जीवाचा ठेका पडतो
तुझ्याच काळजावर...(*२)

अगं अगं राधे किती प्रेम करशील
तुझ्या या कान्हावर...
तुझ्या न माझ्या प्रेमाची ओंजळ..
रिती ही जन्मभर..

का भुललीस तू सांग मला
मी रंगाने हा सावळा..
का जीव जिवाला लावला
प्रीतीत असा का रंगला ?
राधेश्याम एकरूप
गाथा राहील अजरामर‌...(*२)

अगं अगं राधे किती प्रेम करशील
तुझ्या या कान्हावर...
तुझ्या न माझ्या प्रेमाची ओंजळ..
रिती ही जन्मभर..

किती छळले राधे मी तुला
तरी भाव मनी हा गुंतला
मनी बांधिला हा प्रीत झुला तरी
रुसलीस तू सांग मला
गोपाळाचे गीत गाती एकनाथाचे स्वर..(*२)

माझ्या जीवाचा ठेका पडतो
तुझ्याच काळजावर...(*२)
अगं अगं राधे किती प्रेम करशील
तुझ्या या कान्हावर...
तुझ्या न माझ्या प्रेमाची ओंजळ..
रिती ही जन्मभर..

*****
________________


✅या गवळणी पण नक्की वाचा👇👇👇

________________


👀आज या पोस्ट मध्ये आपण अग अग राधे गवळण गीत Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.