Header Ads

नको वाजवू कान्होबा मुरली Lyrics | Nako Vajvu Kanhoba Murali Gavlan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण नको वाजवू कान्होबा मुरली Lyrics बघणार आहोत.
________________________

🌷नको वाजवू कान्होबा मुरली Lyrics🌷

नको वाजवू रे कान्होबा मुरली
तुझ्या मुरलीने सूद बूद हरली
हरली हरली हरली
तुझ्या मुरलीने सूद बूद हरली.. || धृ ||

घागर घेऊन निघाली जाता
डोईवरी घागर पाझरली
नको वाजवू कान्होबा मुरली
तुझ्या मुरलीने सूद बूद हरली.. || १ ||

घरी करीत होते कामधंदा
तेथेच मी गडबडली
नको वाजवू कान्होबा मुरली
तुझ्या मुरलीने सूद बूद हरली.. || २ ||

एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गवळण बावरली
नको वाजवू कान्होबा मुरली
तुझ्या मुरलीने सूद बूद हरली.. || ३ ||

* * * * * * * *
________________________



✅या गवळणी पण नक्की वाचा👇👇👇
________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण नको वाजवू कान्होबा मुरली Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💚💚💚 !!!!!
________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.