Header Ads

ओवाळू आरती शारदे तुला Lyrics | Ovalu Arti Sharde Tula



नमस्कार या पोस्टमध्ये आपण ओवाळू आरती शारदे तुला Lyrics बघणार आहोत.

_______________________

🌷ओवाळू आरती शारदे तुला Lyrics | Marathi🌷

माते तुज पाहूनीया जीव तोशीला
ओवाळू आरती शारदे तुला.. || धृ ||

चार वेद सहशास्त्र नित्य जाहिले
ब्रह्मदीप सुवर्णमूर्ती तेज वाहिले
गुण तुझे वर्णुनिया शेष भासला..
ओवाळू आरती शारदे तुला.. || 1 ||

अंग कांती दिव्य जणू तेज भासले
हास्य वदना दिसत जणू चंद्र बिंबले
सुगंध घेऊन या भ्रमण रंगला
ओवाळू आरती शारदे तुला.. || 2 ||

क्रोध तुझा पाहुनिया शीश डगमगे
विश्वरूप पाहुनी या काळजी पडे
भक्तजन रक्षणासी दैत्य मारला
ओवाळू आरती शारदे तुला.. || 3 ||

आत्मज्योती आरती तुझी ताटी लावली
पंचप्राण पुष्पांजली चरणी वाहिली
मन सुमने गुंफुनिया हार वाहिला
ओवाळू आरती शारदे तुला.. || 4 ||

माते तुज पाहूनीया जीव तोशीला
ओवाळू आरती शारदे तुला.. ||

* * * * *
_________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

_______________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण ओवाळू आरती शारदे तुला Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_______________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.