कोण बरं बोलते घड्याळात Lyrics | Kon Bar Bolato Ghadyalat Baalgeet
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण कोण बरं बोलते घड्याळात Lyrics बघणार आहोत.
____________________
🕙कोण बरं बोलते घड्याळात Lyrics🕙
कधी भिंतीवर कधी टेबलावर..
कधी फलाट तर कधी हातावर..
कोण बरं बोलतो घड्याळात ?
कोण बरं बोलतो घड्याळात ?
टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक...
माझं नाव तास काटा
घाई नाही फिरता फिरता
अख्खा दिवस निघून जातो
दोन चकरा मारता मारता..
मी काही बोलत नाही आत..
मी काही बोलत नाही आत..
टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक...
माझं नाव मिनिट काटा
साठ पावला जातो तासात एका
तास काट्याच्या दोनच फेऱ्या..
माझ्या चोवीस दिवसभरात..
मी काही बोलत नाही आत..
मी काही बोलत नाही आत..
टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक...
माझं नाव सेकंद काटा
धावत राहतो पटा पटा पटा
हजारो चकरा मारतो दिवसात
टिक टॉक गाणं गाता गाता..
माझीच बडबड चालू आत...
माझीच बडबड चालू आत...
टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक...
असे हे आम्ही तीन मित्र
घड्याळात फिरतो सदा एकत्र
सांगतो तुम्हाला पळता पळता
वेळ फुकट घालवू नका
काम करूया गाणं गात
काम करूया गाणं गात
टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक...
* * * * * *
____________________
✅ही बाल गीते पण नक्की वाचा👇👇👇
____________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण कोण बरं बोलते घड्याळात Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
____________________
Post a Comment