अनमोल जन्म दिला ग आई Lyrics | Anmol Janm Dila Ga Aai Tujhe Upakar Fitnar Nahi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण अनमोल जन्म दिला ग आई Lyrics बघणार आहोत.
__________________
👩अनमोल जन्म दिला ग आई Lyrics👩
अनमोल जन्म दिला ग आई
तुझे उपकार फिटणार नाही..
आई तुझ्या मूर्ति वाणी या जगात मुर्ती नाही
अनमोल जन्म दिला ग आई
तुझे उपकार फिटणार नाही...|| धृ ||
बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा तान्हा
अमृताहुन गोड पाजलास पान्हा..
तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही..
अनमोल जन्म दिला ग आई
तुझे उपकार फिटणार नाही...|| १ ||
शाळेतून घरी येताना..
आई उशीर मजला होई..
गल्लोगल्ली पाहत फिरी तू ग आई...
तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही..
अनमोल जन्म दिला ग आई
तुझे उपकार फिटणार नाही...|| २ ||
हाडाचे तू काड करूनी केले रक्ताचे पाणी
तुझ्यासारखे कष्ट ग आई केले नाही कोणी
सुगाचे मी दास सांगे ऐका वेडी वाणी
अनमोल जन्म दिला ग आई
तुझे उपकार फिटणार नाही...|| ३ ||
* * * * *
__________________
✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- माय लेकींच्या जात्यावरील ओव्या Lyrics
- नारी जन्माची पुण्याई लिरिक्स
- सत्यनारायण पूजेच्या वेळी घेण्याचे सुंदर उखाणे
__________________
👀आज या पोस्टमध्ये आपण अनमोल जन्म दिला ग आई Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!
__________________
Post a Comment