माय लेकींच्या जात्यावरील ओव्या Lyrics | हौस ग मला मोठी लोटी शेजारी वटीची
नमस्कार या पोस्टमध्ये आपण माय लेकींच्या जात्यावरील ओव्या Lyrics बघणार आहोत.
________________________
💛माय लेकींच्या जात्यावरील ओव्या Lyrics💛
हौस ग मला मोठी लोटी शेजारी वटीची
शेजारी ग वटीची लेक लेकाच्या पाठीशी
लेकाच्या ग पाठीची लेक लेकाच्या पाठीची
लेकाच्या पाठीची लेक लेकाच्या पाठीची
हौस ग मला मोठी लेक असावी लोकांमधी
असावी ग लोकांमधी गाठू पुतळी गौफामधी
पुतळी ग गोफा मधी गाठू पुतळी गौफामधी
देवाला ग मागितले अवती कुळवी चौघ लेक
कुळविग चौघ लेख न्यारी न्यायाला रंभा एक
न्यायालग रंभा एक न्यारी न्यायाला रंभा एक...
लुगडी च्या घडीवर चोळ्यांची गं चवइड
चोळ्यांची गवईड मला लेकीची आवइड
लेकीची आवईड मला लेकीची आवइड..
लेकाचे गणवेश तुला केल्याती लेकबाई
केल्याती ग लेकबाई माझी मोगऱ्यामध्ये जाई..
मोगऱ्यामध्ये ग जाई माझी मोगऱ्यामध्ये जाई..
लेका गप परायसं लेक कशान बाई उणी
कशान गं बाई उणी एका कुशीची रत्न दोन्ही
कूशीची ग रत्न दोन्ही एका कुशीची रत्न दोन्ही..
लेकीच्या ग आईला नका म्हणू सहालयकी
म्हणू साग सहा लय कि नका म्हणून सहालयकी..
लेकाच्या ग आईला कोणी दिलीया पालयकी
दिलीया गं पालयकी कुणी दिलीया पालयकी
वाण्याच्या ग घरी बाई खडीसाखर ग मोलायची
साखर गं मोलायची खडीसाखर ग मोलायची..
माझीयाग घरामधी लेक लेकाच्या तोलायची
लेकाच्या ग तोलायची लेक लेकाच्या तोलायची..
थोरला ग माझा लेक बाई वाड्याचा कळइस
वाड्याचा ग कळइस बाई माझ्या वाड्याचा कळइस..
धाकटी ग बाळ बाई माझ्या दारीची तुळइस
दारची ग तुळइस.. माझ्या दारीची तुळइस
* * * * * *
________________________
✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण माय लेकींच्या जात्यावरील ओव्या Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏 !!!!!!!
________________________
Post a Comment