लवकर येना बाप्पा मला मारायच्या तुझ्याशी गप्पा Lyrics | Ganpati Bhaktigeet Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण लवकर येना बाप्पा मला मारायच्या तुझ्याशी गप्पा Lyrics बघणार आहोत.
सॉंग - लवकर ये ना बाप्पा
लिरिक्स - यश बरमेचा
सिंगर - विहान सिंग परदेशी, इशिता शेळके
म्युझिक - सौरभ मस्तोली
_____________________
🌹लवकर येना बाप्पा मला मारायच्या तुझ्याशी गप्पा Lyrics 🌹
तुझं स्वागत कराया झालो आतुर
वाट पाहतो कधी येणार तू....
लवकर ये ना बाप्पा...
मला मारायच्या तुझ्याशी गप्पा..|| धृ ||
पप्पांनी आणली लाइटिंग भारी
आता सजावटीची मज्जा खरी
वाजत गाजत नाचत उधळत गुलाल
येना रे बाप्पा....
मला मारायच्या तुझ्याशी गप्पा..
अरे लवकर ये ना बाप्पा...
मला मारायच्या तुझ्याशी गप्पा..|| १ ||
सडा नि रांगोळी दाराला बांधलय तोरण
नारळ किसून आईने केलय सारण
मोदक लाडू चकली करंज्या
खायला देते रे बाप्पा..
मला मारायच्या तुझ्याशी गप्पा..
अरे लवकर ये ना बाप्पा...
मला मारायच्या तुझ्याशी गप्पा..|| २ ||
* * * * *
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_____________________
👀आज या पोस्टमध्ये आपण लवकर येना बाप्पा मला मारायच्या तुझ्याशी गप्पा Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!
_____________________
Post a Comment