Header Ads

विनीला विनीला शेला भरजरी Lyrics | Datta Jayanti BhaktiGeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण विनीला विनीला शेला भरजरी Lyrics बघणार आहोत.

_____________________


विनीला विनीला शेला भरजरी Lyrics

||दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

विनीला विनीला शेला भरजरी
गुरुनाथा गुरुराजा लपेटा तनु वरी || धृ ||

उगवतीचे किरण तेज आभा सोनसळी
काळीज माया वेढली मऊसूत झुळूकी
गूंफियले श्वास नाथा शुभ प्रहरावरी
गुरुनाथा गुरुराजा लपेटा तनु वरी || १ ||

तुझ्याच ओढी नाचवी
झुलवी पालखी खांद्यावरी
जपते नाम तुझे दत्ता निरंतर या ओठांवरी
भोळाच भक्ती भाव सुख सत्कर्माच्या अंतरी
गुरुनाथा गुरुराजा लपेटा तनु वरी || २ ||

ध्यास तुझा आस तुझी घेऊन वेडी पिशी
उसवला मोहपाश आस्था सजवी उरी
स्वीकार सेवा नाथा निर्मळ निस्वार्था परी
गुरुनाथा गुरुराजा लपेटा तनु वरी || ३ ||

बालक मी साधक मी तुझेच लेकरू पायाशी
बिलगून घे हृदयाचे मुक्त कर प्राण देही
तव सेवेचा दरवळला देह गंध चंदनापरी
गुरुनाथा गुरुराजा लपेटा तनु वरी || ४ ||

नाद एकच जीवास गुरुमाऊली ध्यानीमनी
जन्म वाहिला तवा चरणी झालो तुझा ऋणी
ऋण हे अखंड राहो जन्मोजन्मीच्या भाग्यापरी
गुरुनाथा गुरुराजा लपेटा तनु वरी || ५ ||

* * * * *
_________________


ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_____________________


आज या पोस्टमध्ये आपण विनीला विनीला शेला भरजरी Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

_____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.