ब्रम्हांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही Lyrics
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण ब्रम्हांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही Lyrics बघणार आहोत.
____________________________
🌹ब्रम्हांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही Lyrics🌹
ब्रम्हांडाचा धनी खेळतो अत्रिच्या अंगणा |
दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर म्हणा || धृ ||
चंदनाचा करुनी पाळणा अनुसयाच्या घरी |
ब्रम्हा विष्णू महेश रुद्र पुष्पवृष्टी करी ||
तेहतीस कोटी देव करी ती दत्ताची वंदना |
दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर म्हणा || 1 ||
अंगड टोपडं घेऊन आल्या लक्ष्मी सावित्री |
पाळणा गाती गजर सनई चौघडा वाजती ||
पार्वती माळी वरदान देई अत्रिच्या नंदना |
दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर म्हणा || 2 ||
ब्रम्हा विष्णू महेश रुद्र अवतार झाला एक |
दत्त दिगंबर दत्त दिगंबर भक्त मारिती हाक ||
नाहू घालीती दत्त बाळाला लावूनी चंदना |
दत्त दिगंबर म्हणा हो तुम्ही दत्त दिगंबर म्हणा || 3 ||
* * * * * *
_________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________________
आज या पोस्ट मध्ये आपण ब्रम्हांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही Lyrics बघितले.
📑📑पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!
____________________________
Post a Comment