Natyanchi Diwali Song Lyrics | Priyanka Barve, Viraj Daki
आज या पोस्टमध्ये आपण Natyanchi Diwali Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - नात्याची दिवाळी
सिंगर - प्रियांका बर्वे, विराज दकी
लिरिक्स / म्युझिक - सुजित विराज
_________________________
💥Natyanchi Diwali Song Lyrics💥
उजेडाचा सण बाई प्रकाशल्या दिशा दाही
आनंदाला सीमा नाही मन गावाकडं जाई..
मन गावाकडं जाई...
कोंबड्याची बांग आली कानी
वासुदेव गाई गोड गाणी
उटण्यात न्हाऊन पहाट
ही सुगंधी झाली...
लखलख दिव्याची आली दिवाळी..
सोनेरी सुखाची आली दिवाळी..
नात्याला गोडवा देई दिवाळी..
हसऱ्या क्षणाची आली दिवाळी...
किल्ल्यांचे खेळूनी खेळ
मातीशी जुळते ही नाळ..
मुठीत येईल आभाळ
नशीबी ज्यांच्या आजोळ...
सोनियाच्या पावलांनी लक्ष्मी येऊ दे..
जाळून या दुःख सारं सुख सारं मिळू दे..
रंगीबेरंगी रंगांनी दारात सजली रांगोळी..
लखलख दिव्यांची आली दिवाळी...
सोनेरी सुखाची आली दिवाळी..
नात्याला गोडवा देई दिवाळी..
हसऱ्या क्षणाची आली दिवाळी...
पाडव्याचा सण आला रंग नवा प्रेमाचा
लेऊन सजली साजणी स्वामिनी
याचीच मी रुक्मिणी झाले अर्धांगिनी
वरले यास पाहता क्षणी...
सुख ओंजळीत भरूनीया आलं
काजव्याच रान अंगणी सजलं
लावी देवा पाडती देव माया
त्यांच्या सावलीचा स्वर्ग हे मिळालं...
दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी..
गाई म्हशी कोणाच्या माझ्या बळीराजाच्या..
बहिण लाडाची आरती प्रेमाची
ओवाळीते भाऊ रायाला..
मनात मागते देवाला सांगते
सुखाने राहू दे भावाला
दिव्यासाठी जशी ज्योत..
तसे हे निर्मळ नातं..
मायचं नाजूक नातं
रुतलया खोल काळजात...
मखमली रात अशी
चमचम चांदण्यात न्हाली..
लखलख दिव्यांची आली दिवाळी...
सोनेरी सुखाची आली दिवाळी..
नात्याला गोडवा देई दिवाळी..
हसऱ्या क्षणाची आली दिवाळी...
* * * * * *
_________________________
✅हि गीते पण नक्की वाचा 👇👇👇
_________________________
तर आज या पोस्ट यामध्ये आपण Natyanchi Diwali Song Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
_________________________
Post a Comment