Header Ads

विसर्जनाची वेळ येता डोळा पाणी Lyrics | Visarjanachi Vel Yeta Dola Pani



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण विसर्जनाची वेळ येता डोळा पाणी Lyrics बघणार आहोत.
___________________________

🌸विसर्जनाची वेळ येता डोळा पाणी Lyrics 🌸

ओ गणरायाची मंगलमूर्ती
पाहुणे दुःख विसरलो..
विसर्जनाचा दिवस हा आला
अश्रू दाटूनी येती..
विसर्जनाची वेळ येता.. डोळा येई पाणी
बाप्पा चालले बाप्पा चालले हो स्वधामी
बाप्पा चालले हो स्वधामी..
विसर्जनाची वेळ येता...|| धृ ||

पाहुणा बनून येती दुःख सर्वांचे हरती
जगी आनंद पसरते प्रभूंची अशी ही 
प्रीती मनामनातून भाव प्रगटतो
लवकर या नितवर्षी
बाप्पा चालले बाप्पा चालले हो स्वधामी
बाप्पा चालले हो स्वधामी..
विसर्जनाची वेळ येता..|| १ ||

पाहुनी मंगलमूर्ती ढोल ताशे गर्जती
गर्दी भक्तांची झाली गणाची स्वारी निघाली
मनामनातूनी ज्योत उजळती
यश लाभो तुज भक्ती
बाप्पा चालले बाप्पा चालले हो स्वधामी
बाप्पा चालले हो स्वधामी..
विसर्जनाची वेळ येता..|| २ ||

वेळ ती जवळ आली निरोपाची तयारी
लोटला जनसागर हा आर्थ बाप्पा पुकारी
पाहता राजा तेजु काया पुन्हा नयनी पाणी
बाप्पा चालले बाप्पा चालले हो स्वधामी
बाप्पा चालले हो स्वधामी..
विसर्जनाची वेळ येता..|| ३ ||

* * * * * * *
___________________________

✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
___________________________

आज या पोस्टमध्ये आपण विसर्जनाची वेळ येता डोळा पाणी Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
___________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.