चल जाऊ दे घ्याया दर्शन Lyrics | Chal Jau De Ghyaya Darshan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण चल जाऊ दे घ्याया दर्शन Lyrics बघणार आहोत.
_________________________
चल जाऊ दे घ्याया दर्शन Lyrics
चल जाऊ दे घ्याया दर्शन
गुरु देवासी करण्या वंदन || धृ ||
लगबग स्नान करुनी गंगेचे
धुवूनी काढूया मैल मनाचे
नवस्फूर्तीचे लावूनी उटणे
उल्हासाचे लेऊनी भूषण
गुरु देवासी करण्या वंदन || १ ||
हृदय मंदिरी दिप धरोनी
आसन निर्मळ शूद्ध करोनी
स्थापन करूया गुरुदेवाचे
सुंदर पुष्पित ध्यान चिरंतन
गुरु देवासी करण्या वंदन || २ ||
मंजुळ विना लावूनी तारी
अनहद वाद्य वाजती भेरी
तुकड्या दास म्हणे या रे या
तोडू या बोधे भव बंधन
गुरु देवासी करण्या वंदन || ३ ||
चल जाऊ दे घ्याया दर्शन
गुरु देवासी करण्या वंदन ||
********
_________________________
_________________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण चल जाऊ दे घ्याया दर्शन Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛 !!!!!!
_________________________
Post a Comment