परब्रम्ह निष्काम तो हा गौळिया घरी गवळण Lyrics | Sant Namdev Maharaj Abhang
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण परब्रम्ह निष्काम तो हा गौळिया घरी गवळण Lyrics बघणार आहोत.
परब्रम्ह निष्काम तो हा गौळिया घरी गवळण Lyrics | Marathi
परब्रम्ह निष्काम तो हा गौळियां घरीं ।
वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥
म्हणती गौळणी हरीचीं पाउलें धरा ।
रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥
लपत छपत येतो हरी हा राजभुवनीं ।
नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनीं ॥३॥
सांपडला देव्हारीं यासी बांधी दाव्यांनीं ।
शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥
बहुता कष्टें बहुता पुण्यें जोडलें देवा ।
अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥
नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा ।
जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥
* * * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- नको मारु खडा रे नंदलाला गवळण
- राधा कृष्णाची कोण लागती गवळण Lyrics
- छंद नाही नामाचा देह काय कामाचा अभंग Lyrics
- चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई अभंग
तर आज या पोस्ट मध्ये आपण परब्रम्ह निष्काम तो हा गौळिया घरी गवळण Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment