यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल गवळण Lyrics | Gavlani Lyrics Marathi
यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल गवळण Lyrics
यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल ॥ धु ॥
साध्या गव्हांची पोळी लाटी । मला पुरण पोळी करून दे मोठी ।
नाहीं अडवीत गुळासाठीं । मला जेवू घाल ॥१॥
तूप लावून भाकर करी । वांगें भाजून भरीत करीं ।
वर कांद्याची कोशिंबिरी । मला जेवू घाल ॥२॥
आईग खडे साखरेचे खडे । लवकर मला करून दे वडे ।
बाळ स्फुंदस्फुंदोनी रडे । मला जेवूं घाल ॥३॥
आई लहानच घे गे उंडा । लवकर भाजुन दे मांडा ।
लांब गेल्या गाईच्या झुंडा । मला जेवूं घाल ॥४॥
आई मी खाईन शिळा घांटा । दह्याचा करून दे मठ्ठा ।
नाहीं माझ्या अंगीं ताठा । मला जेवूं घाल ॥५॥
भाकर बरीच गोड झाली । भक्षुनी भूक हारपली ।
यशोदेनें कृपा केली । मला जेवू घाल ॥६॥
आई मी तुझा एकुलता एक । गाई राखितों नउ लाख ।
गाई राखून झिजलीं नख । मला जेवू घाल ॥७॥
नामा विनवी केशवासी । गाई राखितो वनासी ।
जाऊन सांगा यशोदेशी । मला जेवू घाल ॥८॥
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- देखण्या रुपाची राधा आहे गवळ्याची गवळण Lyrics
- राधा कृष्णाची कोण लागती गवळण Lyrics
- लहान हो लहान हो हरी गवळण Lyrics
- यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान गवळण
तर आज या पोस्ट मध्ये आपण यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल गवळण Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment