Header Ads

कुठ कुठ शोधू मी कान्हाला Lyrics | Kuth Kuth Shodhu Mi Kanhala Ga



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कुठ कुठ शोधू मी कान्हाला Lyrics बघणार आहोत. राधा कृष्णाची खूपच सुंदर अशी ही गवळण आहे.

कुठ कुठ शोधू मी कान्हाला Lyrics

घरी नाही, दारी नाही, यमुनेच्या तिरी नाही,
मुरली येईना ऐकायला,
कुठ कुठ शोधू मी कान्हाला गं
कुठ कुठ शोधू मी कृष्णाला || धृ ||

करीत होते मी कामधंदा,
कुठे दिसेना नंदाचा कान्हा
हात माझा होता शेनाला गं
कुठ कुठ शोधू मी कृष्णाला || १ ||

करीत होते मी भाजी पोळी,
कुठे दिसेना कृष्ण मुरारी
हात माझा होता पिठाला ग
कुठ कुठ शोधू मी कृष्णाला || २ ||

करीत होते ताक, लोणी
कुठे दिसेना नंदाचा हरी
हात माझा होता लोण्याला गं
कुठ कुठ शोधू मी कृष्णाला || ३ ||

एका जनार्दनी पूर्ण कृपेने
हात माझा हरी चरणाला गं
कुठ कुठ शोधू मी कृष्णाला || ४ ||

घरी नाही, दारी नाही, यमुनेच्या तिरी नाही,
मुरली येईना ऐकायला,
कुठ कुठ शोधू मी कान्हाला गं
कुठ कुठ शोधू मी कृष्णाला || धृ ||

* * * * 

कृष्णाच्या गवळणी lyrics



हे पण नक्की वाचा 👇👇👇




आज या पोस्टमध्ये आपण कुठ कुठ शोधू मी कान्हाला Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.