अफजलखानाचा वध पोवाडा | Afzal Khan Vadh Powada Lyrics
नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण अफजलखानाचा वध पोवाडा बघणार आहोत. इथे अफजल खानाच्या वधाचे तीन पोवाडे तुम्हाला वाचायला मिळतील.
Afzal Khan Vadh Powada Lyrics
🙏🙏♔♔⚶⚶⚶♔♔🙏🙏
अफजलखानाचा वध पोवाडा १
चौक १
माझें नमन आधी गणा सकळिक ऐका चित्त ॥
नमियेली सार्या । केल्या जडितें भूषण ॥
अज्ञानदासाचें वचन । नमिला सद्गुरु नारायण ॥
सद् गुरुच्या प्रसादें । संपूर्ण अंबेचें वरदान ॥
गाइन वजिराचें भांडण । भोसल्या सरजादलभंजन ॥
फौजेवर लोटां । यशवंत खंडेश्वरी प्रसन्न ॥
अज्ञानदास बोलले वचन । गाइन राजाचें भांडण ॥
देश इलाइत काबिज केलें तळकोकण ॥१॥
चौक २
गड मी राजाचे गाईन । कोहज माहुली भर्जन ॥
पारगड कर्णळा । प्रबळगड आहे संगिन
मस्त तळा आणि घोसाळा । रोहरी अनसवाडी दोन ॥
कारला कासगड मंडन । दर्यांत सागरी दोन ॥
गड बिरवाडी पांचकोन । सुरगड अवचितगड भूषण ॥
कुबल गड भीरिका कुर्डुगडाचें चांगुलपण ॥
धोडप तळकोकणचे किल्ले, घाटावरले गडाईन ॥२॥
चौक ३
गड आहे रोहिडा । जामली प्रतापगड मंडन ॥
मकरंदगड वांसोट. सिंहगड वृंदावन ॥
पुरंधराचें चांगुलपण । उंच झुलवा देत गगन ॥
सोन्याची सुवेळा आहे राजगड संगिन
कोंडाण्यापासून तोरणा वर्तता । कोर रेखीली घाटमाथा
तुंग आणि तुकोना. विसापुर लोहगड झुलता
गड राहेरची स्थिती. तीन पायऱ्या सोन्याची तक्ता ॥
इतर प्रतापगड सदस्यां । अवघड दिसे घाटमाथा ॥३॥
चौक ४
मस्त हुडे दुर्गाचे खण । माहाल राजाचे गाइन ॥
पुणे भिस्तका दरगा. शेकसल्ला पीर, पाटण
शिरवळ सुपे देस. थेट ज्यानें इंदापुरा पासुन ॥
महाड गोरेगाव पासून. घेतले शिंगारपूर पाटण ॥
असे तुळजेचे परिपूर्ण. सोडविलें चवदा ताल कोंकण ।
उठ बारा बंदरें । भाग्य राजाचे संगिन ॥४॥
चौक ५
देश जग काबिज केली. बारा माउळें पुढें ॥
चंद्रराव कैद केला । गड जाउली त्याची ॥
चेताउली काबिज केली । ठाणी राजाची बैसलीं ॥
उच्च जाउली न माहुली । कल्याण भिंडी काबिज केली ॥
सोडविलें तळकोंकण । चेउलीं ठाणीं बैसविलीं ॥
कुबल, बांकी घरें । शिवराजाची हाता आलीं ॥
मुलाना हामाद । फिर्याद बाच्छायाप घेणे
बाच्छायजादी क्रोधा आली. जैशी अग्न परजली ॥
जित धरावा राजाला । कुलवजिरांला खबर दिली ॥५॥
चौक ६
बाच्छाय(ये) पाठविले प्रमाण । वजीर वाडा तमाम ॥
अब्दुलखान, रस्तुम जुमा सिद्दी हिल, मुशेखान ॥
मेळविलें वजिरांला । बाच्छाय बोलावी कवणाला ? ॥
बुडी बाजी घोरपड्याला । घाटग्या झुंझारयाला
वोकी खऱ्या कोबाजीला । त्या नाईकजी पांढऱ्याला
देवकांत्या जीवाजीला । मंबाजी भोसल्या
बावीस उंबरावजुनी । आले बाच्छाय नेहमीला ॥६॥
चौक ७
बाच्छायजादा पुसे वजीरांला । धरीसा आहे कोण शिवराजाला
बावीस उंबराव आले . विडा पैजेचा मांडिला ॥
सवाई अबदुल्या बोलला. 'जिता पकडूं मी राजाला'.
निरोप दिला कुल्वजिराला । अब्दुल सदरे नवजिला
विडा पैजेचा निर्देश (म्हणून) तुरा मोत्याचा लाविला ॥
गळांअ घातलीं पदकें । खान विजापुरीं बोलला ॥
फिरंग घोडा सदरे दिला । बाछायानें नवाजीला ॥
तीवरांची मोहीम । देख अबदुल्या चालला ॥७॥
चौक ८
खान कटकबंद केला. कोट विस्तार डेरा दिला ॥
मोठा अपशकुन जाहला । फत्यालसकरा हत्ती मेला
खबरनार बाछायाला । बिचा हत्ती पाठविला ॥
बारा हजार घोडा. अबदुलखानालागीं दिला ॥८॥
चौक ९
संगत कुंजर मस्त हत्ती । आग झगडयाची मस्तुती
अरबी गाड्या. कोतवालतेजी धांवा घेती ।
सातशे उंट आहे बाणांचा । करडा समुद्री खानाचा ।
वजीर अब्दुलखान। त्याच्या दाळाची गणती.
बारा हजार घोडा. उंबराव ताबिन चालती ॥९॥
चौक १०
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥
मजलीवर मजल. अब्दुल तुळजापुरा आला ॥
तुळजा वरती मसुदच बांधली
मसुदुनी सुं गाय जब केली ॥
अब्दुलखान फारी देवीला । 'कांहीं एक अजमत दाव मला' ॥
कोपली भद्रकाली । बांधुनी शिवराजप दिला.
अंबारा स्वप्नांत (ला) । कांहीं एक बोल शिवराजाला ॥
'बत्तीस दातांचा बोकड । आला वधायाला ॥१०॥
चौक ११
तेथून कुच केलें कटकाला । अब्दुल दरमजली चालिला ॥
मजलीवर मजल. अब्दुल माणकेश्वरा आला ॥
तेव्हां त्या अब्दुलखानानें । हालि मांडले देवाला ॥
तेथुनि कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥
मजलीवर मजल. अब्दुल करंभोशा आला ॥
तेथुनि कुच केलें कटकाला । अब्दुल दरमजली चालिला ॥
मजलीवर मजल. वेगीं पंढरपुरा आला ॥
काहीला विठोबा. पुंडलिक टाकिला ॥११॥
चौक १२
कुच केलें कटकाला । अबदुल फौजेनें चालिला ॥
मजलीवर मजल. वेगीं महादेवासी आला ॥
तेव्हां त्या अब्दुलखानानें । दंड बांधिला शंभुला ॥
हाल हिंदुच्या देवाला । अबदुलखान (नें) धाक लाविला ॥
तेथुनि कुच केलें कटकाला । अब्दुल दरमजली चालिला ।
मजलीवर मजल. अब्दुल रहिमतपुरा आला ॥१२॥
चौक १३
अब्दुल आलासे बोलती । धाकें गड किल्ले कांपती ॥
वजीर उंबराव बोलती । 'शिवाजीस गडे कोंडू', तो.
अब्दुल सारा किती आहे. त्याच्या दाळाची गणती
बारा हजार घोडा. उंबराव ताबिन चालती
सौंदळीं भांडतां । मग कणकीला मीठ किती ? ॥१३॥
चौक १४
तेथुनि कुच केलें कटकाला । अब्दुल वाईलागी आला ॥
आपुल्या मुखांत. कोटुन पिंजरा केला ॥
बरेपणाचा कागद (देऊन) हेजिब महाराजाप गेला ॥
राजात मस्ती । देश पाठीशीं धाडसी ॥
मध्यम दिले किल्ले डेरा जाउलींत दिला ॥
राजा जाउलींत । हेजिब अबदुल्याचा आला ॥१४॥
चौक १५
हेजिब बोले महाराजाला । 'खान बऱ्यापणाशीं आला ॥
खानाला भेटतां । थोर बाच्छाये सल्ला दिला'
राजा बोले हेजिबाला । 'कशाला बोलवितां वाईला? ॥
किल्ले गड कोट । दवलत खानाच्या हवाला ॥
जाउली खानाच्या हवाला । लिहून देतों हेजिबाला
बैसूं उपस्थितजण बुध सांगेल आम्हांला' ।
लुगडीं दिलीं हेजिबाला । हेजीब 'बेगीं' रवानाही' ॥१५॥
चौक १६
हेजिबाची खबर ऐकुनी । अब्दुल महाभुजंगही
अब्दुलखान (ने) कउल दिला. रोटीपीर पाठविला ॥
'भिउ नको शिवाजी भाई । आहे तेरा माझा सल्ला
तुझे गढू हवाला । आणिक दवलत देतों तुला ॥
तुझी सामानशी गोष्ट. क्रिया शहाजीची आम्हाला'
इकडे कउल पाठविला. (पण)शील चा राउत निवडिला ॥
हत्तीचे पायीं तोरड । लाविला गजळा ॥
नदरे पडतां । दस्त करा शिवराजाला ॥१६॥
चौक १७
राजा हेजीबासि बोलो । 'खंड काय मला मागतो ॥
चउआगळे चाळीस गड । मी अब्दुलखानालागीं देतों.
मजवर कृपा आहे खानाची । जावलींत सदरा सवारितो ॥
तेथें या भेटायाला । मी खानाची वाट पाहतों ' ॥
हेजिब तेथुनि निघाला । अबदुलखाना जवळ आला
अब्दुलखानामोहरें । हेजिब (बें) टाकिला प्रमाण ॥
अब्दुल पाहतो वाचून. 'खुंटले गनिमाचे मरण' ॥
आले गड किल्ले. खुशी जला अब्दुलखान ॥१७॥
चौक १८
हिगडे सल्ला कउल दिला. खासा राउत निवडिला ॥
चार हजार घोडा. हालका धराया ॥
हत्तींचे पायीं तोरड ज्याला । वरी सोडल्या गजला ॥
फौजामागें फौजा. भार कडक्यानें चालला ॥
रडतोंडीच्या घाट संघर्षं । अब्दुल सारा उतरुं दिला ॥
इसारत सरज्या लोकांला । ज्यांणीं घाट बलाकाविला ॥
माग घडला खबर नाही पुढल्याला. कटकाची खबर, कैची त्याला ॥
जाऊं जाणें आदिं नेणें । हीगत बो अबदुल्या ॥
जावलींत उतरुनि । अब्दुल दिशीभुला जाहला ॥१८॥
चौक १९
राजानी सदरा स्वारिल्या । गाद्या पडगाद्या घातल्या ॥
तिवाशा जमखान टाकिले । सदर पिकदाण्या ठेवल्या
सुरंग चारी खांब सदरेचे । वरी घोंस मोतीयांचें ॥
माणिक भरणी हारी मोत्यांच्या बसविल्या ॥
सदरेची मांडणी. सूर्य लखलखितो गगनीं ।
मणिकाचे ढळ सदरे सुवर्णाचें पाणी ॥
काचबंदी पटांगणाचा ढाळ । कापुर कस्तुरी परिमळ ॥१९॥
चौक २०
तिसरे सदरेची मांडणी । हिरे जोडले खनोखणीं ॥
खासियाचे पलंग. ते ठेवोनी मध्यस्थानीं ॥
वाल्याच्या झांजी । दबण्याचे कुंड घालोनी ॥
बराणपुरी चिटके । आडोआड पडदे बांधुनी ॥
चाहुंकोनी चारी समया । चांदवा जडिताचा बांधोनी ॥
घोंस मोत्यांचे । वर ठिकडी नानापरिची ॥
अवघी जडिताची लावणी. हिरे जोडले खनोखणीं ॥
बहुत स्वारिल्या सदरा ॥ ऐशी नाही पाहिल्या कोणी ॥२०॥
चौक २१
राजानीं सदरा स्वारिल्या । हेजिब अबदुस धाडिला
मोरो ब्राह्मण पाठविला । अब्दुलखानासी बोलाविला ॥
'चार हजार घोडा । कोण्या कामास्तव आणिला ?' (म्हणून) त्याला बाहेर निराळा ठेविला ।
दहा पांचांनिशीं चालिला ॥ 'एकांत गोष्टी.
तेथें दहा पांचांचा ॥ पालखी दुर करा भोईला ।'
खासा अब्दुल चालला ॥ 'हात चालवा व्हा. दुर करा' म्हणे खानाला ॥
वस्त्रें केली हेजीबाला । शामराज नवजीला ॥२१॥
चौक २२
भवानीशंकर प्रसन्न ज्याला । तुळजा मदत शिवराजाला
भोग पुरला खानाचा । अब्दुल जावलींत आला ॥
बिनहत्याराविण मोकळा । अब्दुल सदरेलागीं आला ।
अब्दुल आधी सदरे गेला । सदर देखुनी सुखी ॥
'ऐशी सदर। आमच्या आली इदलशाला ॥'
प्रस्ताव खान सदरे गेला. सदर देखुनि सुखी ॥
'ऐशी सदर। नवरंगशा बाच्छायाला'
अब्दुल तिसरे सदरे गेला । सदर देखुनि सुखी ॥
'ऐसी सदर नाहीं अवरंगशा बाच्छायाला' ॥ अब्दुलखान बोलिला ।
'शिवाजीस आणावयाला' ॥ २२ ॥
चौक २३
राजा नवगजींत बसला । मोरो, शाम बोलविला
रघुनाथ पेशवे । नारो शंकर पाचारिला ॥
दहातोंडया माणकोजीला । त्या इंग्लिश सुभानजीला
देवकांत्या जीवाजीला । राजानें बोलाविले तुम्हांला ॥
करनखऱ्या सुभानजीला । बेलदारा पिलाजीला
त्या बोबड्या बहिरजीला । सरदार आले ॥ २३ ॥
चौक २४
राजा विचारी भाल्या लोकांला । 'कैसें जावें भेटाया' ॥
बंकर कृष्णाजी बोलला । 'शिवबा सील करा अंगाला'
भगवंताची सील ज्याला ----- आंतून, (तो) बारीक झगाल्या ॥
मुसेजर सुरवारा । सरजा (जें) बंद सोडुन दिला ॥
डावे वाटें बिचवा त्याला (ल्या) वाघनख सरांच्या पंजाला ।
पटा जिव म्हाल्याप दिला । सरजा बंद सोडुन चालिला ॥ २४ ॥
चौक २५
'माझाराम दादानु' ॥ गडाच्या गडकऱ्या बोलिला ॥
जतन भाईनु करा. आमच्या संभाजीराजाला
सराईत उमाजी राज्य (राजा) होईल तुम्हांला
गड निवितो गडकऱ्याला राज्य निर्वितो नेतोजीला ॥
निर्वाणीरव दादानु । विनंती केली सकलीकाला
'येथुनि सलाम सांगा । माझा शहाजी महाराजाला'
खबरराना जिजाऊला । शिवबा भेट भेटायला
पालखींत बैसुनी । माता आली ॥ २५ ॥
चौक २६
शिवबा बोलले जिजाऊ सवें । 'बये वचन ऐकावें ॥
माझी आसोशी खानाला । 'बये जातों भेटायाला'
जिजाऊ बोले महाराजाला । 'शिवबा न जावें भेटायाला ॥
मुसलमान बेइमान. खान राखिना तुम्हांला' ॥
राजा बोले जिजाऊला । 'येवढी उंबर भेट दिली नाही कोणाला
येवढी गोष्ट माते. आज द्यावी मला
आई अब्दुलखान आला ॥ यानें धाक लाविला देवाला' ॥
जिजाऊ बोले महाराजाला । 'शिवबा बुद्धिनें काम करावें ।
तीं संभाजींचें ॥२६॥
चौक २७
जिजाऊ घेतली अलाबला । 'शिवबा चढती दवलत तुला ॥
घे यशाचा विडा'. शिवबा स्मरे महादेवाला ।
गळां घातली मिठी । मातेच्या चरणासी परिणाम ॥
ध्यानीं आठवुनी भगवंताला । शिवाजी राजा सदरे गेला ॥२७॥
चौक २८
'पहिला सलाम. माझा भवानीशंकराला
दुसऱ्या सलाम माझा शहाजी महाराजाला ।
तिसरा सलाम अमचे अब्दुलखानाला'
शिवाजी सरजे सलाम केला । अब्दुलखान (नानें) गुमान केला ॥
मनीं धरलें कपट । पुरतें कळलें महाराजाला ॥
मग तो शिवाजी सरज्याला । खान दापुनी बोलला ॥
'तूं तो कोणीबीका छोकरा. सर्वत बाच्छाई सदरा' ॥२८॥
चौकोन
जवळ उपरी राजा बोले । त्या अब्दुलखानाला
'खाना ज्याची करणी त्याला. कांहीएक भ्यावें रघुनाथाला ॥
तुम्ही जातीचे कोण? आम्ही जाणतो तुम्हाला
तूं तरी भटारनीका पुत्र । शिवाजी सर्यापर लाया तोरा'
बाई अब्दुल बोलला ॥ 'शिवा तुम चलो विजापुराला' ॥
'शिवाजी सरजे नेतां. बहुत दिन लागतील खानाला
कळला पुरुषार्थ । तुमचा बसल्या जाग्याला' ॥२९॥
चौक ३०
'अब्दुल जातका भटारी । तुमने करना दुकानदारी'
इतकिया उपरी । अब्दुल मनीं खवळिला पुरा ॥
कव मारिलि अबदुन सरजा गवसून धरला सारा ॥
चालविले कटयार । सिलवर मारा न चाले जरा ॥
सराईत शिवाजी। त्याने बिचव्याचा मारा केला.
उजवे शहर बिचवा त्याला. वाघनख सरजाच्या पंजाला ॥
उदरच फाडुनी । खानाची खानाची आणिली द्वारे ॥३०॥
चौक ३१
'लव्हा लव्हा' खान बोलिला । खानाचा लव्हा बेगिन आला ॥
राजानें पट्टा पुटळा । अब्दुलखानाने हात मारिला ।
शिरीचा जिरेटोप तोडला । सरजा(ला) जरासा शक्ती ।
भला सराईत शिवाजी । पटयाचा गुंडाळा मारिला ॥
मान खांदा गवसुनी । जानव्याचा दोरा केला ॥
अब्दुलखान शिवाजी दोन । भांडती दोनी धुरा
बारा हजार घोडा. सरदार नाही कोणी तिसरा ॥३१॥
चौक ३२
अब्दुलखानही पुरा । कृष्णाजी ब्राह्मण उठावला ॥
शिवाजी राजा बोलला. 'ब्राह्मणा मारुं तुला.
तुजशीं मारतां शंकर हांसेल आम्हांला' ॥ नाईकतां ब्राह्मणें ।
हात कोणता मारिला । 'ब्राह्मणा मारुं तुला.
क्रिया शहाजीची आम्हांला' कृष्णाजी ब्राह्मण (नें) ।
हात तिसरा टाकिला (तरी) होईल ब्रह्मत्या भोंसल्यासी ।
( म्हणून ) शिवांजीनें राखिला ॥ कृष्णाजी ब्राह्मण मागे सरला ।
सैद बंडु मोहरे आला ॥ होता जिउ म्हाल्या ।
त्यानें साद पुरा केला ॥३२॥
चौक ३३
खान पळतां पाय काढिला ॥
मेळविला भोकें । पालखींत चालविला ॥
कावजीचा संभाजी भोंसला । खूप उडीनें आला ॥
सुंदरा करणे भोगांच्या पाया(ला) । खटारां धरणव्हर पाडिला ।
शिवाजीराजा बेगिन आला. शिर कापुनी गडावर गेला ॥
जराचाच मंदिल. शिरीं त्या संभाजीचे घातला ॥
फाजिलखाना क्रोध आला. बाण आणि बंदुखा थोरव एकच केला ॥
शिवाजीराजाचा चपाटा । फाजिलखान बारा वाटा
हाल महाराजाचे अब्दुलच्या लोकांला ॥ ३३ ॥
चौक ३४
प्रतापगडाहुनि केला बंद । मारिती खुण सरज्या लोकांला ॥
धरल्या चारी वाटा. ज्यांनीं घाट बलकाविला ॥
दळ त्या समई. पायदळाचा कडका आला ॥
सिलीमकर, खोपड्या, । काकडया, सुरव्या, लोटला ॥
अंगद हनुमंत रघुनाथाला । पायचे पायदळ शिवाजीराजाला
'फिरंग ठेवी जाउद्या, त्याला । तुम्ही उगारल्या पाइकाला' ॥
फत्ते महाराजाची वाटली कुलवजीराला ॥३४॥
चौक ३५
पलतां फाजिलखान । त्याचा दुमाळा
माघारा फिरोनि. जान(नें) व्यापारीचा आरोबा दिला ॥
शिवाजीचे हाल । फाजिलखान घाय (यें) पुरा केलाअ ।
घोडा आणि राऊत. ज्यांणीं पाडाव केला ॥
वळल्या वरल्या ढाला । चार हजार घोडा अबदुल्या जावळींत बुडविला ॥
भवानी शंकर प्रसन्न ज्याला । यश राज्याला खंडयाला ।
सर्ज्या तोरड महिमोर्तब शिवाजीला । फत्ते गो महाराजाची ते वेळ पन्हाळा दाखला ॥३५॥
चौक ३६
अज्ञानदास विनवी श्रोत्याला । राजा अवतारी जन्माला ॥
नळनीळ सुग्रीव जंबूवंत । अंगद हनुमंत रघुनाथाला ॥
एकांती भांडन. जसें राम रावणाला ॥
तैसा शिवाजी सरजा । एकांती नाटोपे कवणाला ॥
दृष्टी पर्यस शिवाजीला । कलीमधीं अवतार जन्माला ॥
विश्वाची जननी । अंबा बोले शिवाजीला
मधुर भक्तीं फळे । महादेव भाकेला गोंविला ॥
जिकडे जाती, तिकडे यशाच्या राज्याला ॥३६॥
चौक ३७
माता जिजाऊ बोलली. पोटीं अवतार जन्माला ॥
शंकपाल शिवाजी महाराजांनी केला । आता मी गाईन.
भोंसले शिवरायाच्या ख्याति ॥ दावा हेवा जाण ।
शेवट संग्रामाची गती राजगड राजाला.
प्रतापगड जिजाऊला धन्या जिजाऊचे कुशी ।
राजा अवतार जन्माला ॥ आपल्या मतें अज्ञानदासानें ।
बीरमल राज्याचा गाइला शिवाजी सर्यानें ।
इनाम घोडा बक्षीस दिला ॥ शेरभर सोन्याचा.
तोडा हातांत घातला ॥ यश जगदंबेचें ।
तुळजा प्रसन्न शिवराजाला ॥३७॥
✶ ✶ ✶ ✶
अफजलखानाचा वध पोवाडा २
धन्य छत्रपति वीर, रणी रणधीर,
देख तलवार, देशधर्माची राखण शान,
केले मराठी प्राण कुर्बान, एकारा शाहीर गातो गुणगान ॥
पैजेचा विडा करून, मोठया धैर्यानं, अफझुलखान निघाला,
शिवाजीस धरण्यास, खांदे वाक्ये सह्यास,
सांगतो आता ऐका घडला इतिहास ॥
चालेल
जोशात निघाला खान, सरदार विजापुरवाला
शिवनेरी शूर सिंहा, होच्या तय्यार झुंझायाला ॥
भिडवतो मराठी भाला, लाव त्या चंद्रकोरीला ॥
ही वार्तालाप करणारे, भगव्या वस्त्रे फिरणारे.
शिष्य ते मठाचे प्रेमे ।
चालेल
ते घोषत होते मंत्र, जयजय रघुवीर समर्थ ॥
धिप्पाड घडे अफझुला, सर्वाला, धरिन शिवाजीला,
भय रेड्याची होती अंगात, नामी सरदार सैन्यात,
निघाला शिवाजीस धरला सारा फौजफाटा बघ, खान निघाला ॥
बारा हजार होत घोडदळ, तोफा संगतिला
उध्वस्त करित मुलुखाला, खान चालला ॥
हिंदूची देवळ त्यान घातली बघा मातीला ॥
तुळजापुरची आई भवानीही भरडी जात्याला ॥
किती केली ती लुटलं बघा तिला ॥
बेअब्रू केली भगिनीची मुलुख जाळीला
शिवाजीच्या स्वप्नी, भवानी मातेने, मोठया प्रेमान,
संकटाची सूचना दिली शिवबास, मस्तवाल रेडा सुटला मुलुखास
तय्यार हो राजा झुंज मिलस ॥ भिडतो मराठी भाला,
उलट्या कालजाला, कळू दे खानाला, राजा मावळ्यांचा सदा तय्यार,
तुमची अशी पुन्हा नाही, धन्य शिवराय अवतार ॥
जमविले शूर सरदार, मावळे बहाद्दर, बर्च्छी तलवार,
व्हारे तयर देखना, इशारा रणी धडा मस्त खानास ।
राजा मावळ्यांचा सांगे सकलास ॥
प्रताप गडी खान आनंदला, वरती शिवबाला ॥ खानाच सैन्य अगणीत
शिवा दचकला शक्ति युक्तिंच, धाडा शिकवून खानाला ॥
असा विचार केला शिवबान, तुम्हाला सांगतो ॥ निरोप पाहिला दूत,
भेटे शिवाजी राजाला शरण आला देईन जीवदान,
खान बोलला ॥ साहेब भ्यालो मी बघून, तुमची सेना ॥
तुमचा प्रताप ऐकूनही घोर युद्ध चित्ताला ॥ कधी शक्ति कधी युक्त,
श्री शिवबान, वेळ, नमविले नामवंत सरदार,
निरोप काय धाड सांगतो खानास, लक्षा कवनास ॥
किती करू शौर्य वर्णन, कीर्ति गुणगान, धर्माभिमान,
घडला इतिहास सांगतो सकळास,
भाले भाले धाडले धरण्या शिवबास, निराशाच आली सदा वाटयास ॥
पुन्हा नाही वाटेला, शिवा बोलला ॥ परत करीन तुमचा सारा मुलुख,
काबीज केला ॥ नाव ऐकुन तुमचा बघा घाम सुटला अंगाला
शरण आलो तुमच्या साऱ्या अटी, आम्हाला
एक वेळ करा तुम्ही क्षमा करा, अज्ञ बालकाला ॥ भेट याव मम हर्ष होइल चित्ताला
चालेल
शिवरायाचा निरोपखल, दूत परत आला ॥
शरणगतीची चर्चा ऐकूनी, खान खुषी ॥
दाढीवरती हात फिरवितो, मिशीवरती ताव ।
ऐरा आरा नासे मी अफझुला नांव ॥
कसा दरारा दिसली कारे सोडली खानाची ।
फाटक्या सरशी दाविन वेदया वाटच स्वर्गाची ॥
भेटीस खान पाठवी, निरोप शिवबाला ।
चालेल
पुढच्या चौकी ऐका बंधूनो, प्रकार जो घडला ॥
अफझुल्ल भेटीला, माची वर मांडव घातला,
आकाशी रंगविला मांडवाला वर तार चंद्र दादा झाल्लारी लावल्या
हंडया, झुंबर जागो जागेला, आरसे टांगले खांबा खांबाला,
केळीचे खांब लावले महाद्वाराला, कारंजी जागो जागेला,
तोरणं लावली जागो जागेला, पताकानी महासविला,
हार गुच्छे ठेवले, गाद्या गिर्या घातल्या बसन्याल,
लोड, तक्के, जागो-जागेला हत्ती, घोडे ठेवले शोभेला,
असं वाटलं जणूं आज स्वर्ग भूमिवर आला.
चालेल
मांडव बघुनी खान मनमध्य अति खुषी
शिवबा होता त्या खानाच बारस जेवलेला ॥
वर दिसला खान खुष झाला, पर आत होता भडकला,
द्वेष भरला रोमारोमाला, करकरा खातो दाताला,
आली बदला, हा बार जर का फुकट गेला,
पुन्हा नाही घावणार, हे पक्क ठाऊक खानाला,
शिवबाचा काटा काढण्याचा, विचार केला ॥
चालेल
शिवबाची गातो मी गाथा, नमुन माथा, धन्य सर्वथा,
झुकविले जुलुमी शहा आणि खान, गर्वान जेबे होते बेभान,
अजूनही गाती कवीगान ॥
चालेल
पायावरती मस्तकी ठेवी, राजा जिजाईच्या
पालामुला मी उखडुन फेकिन, आदिलशाहीच्या ॥
आशिर्वाद दे आई मजला भेटला
कडकडून मग मिठी मारते, जिजा शिवाजीला ॥
घळघळ घळघळ अश्रू वाहती, माता पुत्रांचे
शब्द तोकडे वर्णन करणे
जिजामाता सांगे शिवबाला, होशियार ।
आशिर्वाद आईची कृपा सदा तुम्हावर ॥
सारे ठेवा मावळे रणवीर सज्ज ।
केव्हा होईल घात जिवाला, कळणार नाही ॥
अशी नामी शिवबाळ, कधी न नेता ॥
चालेल
देवीचं देख दर्शन, श्रीशिबान, समय वळखून
केला भिचा धावा चित्तात, कर्मचारी हा देह
धर्मकार्यास, अभय देवीन दिलं शिवबास ॥
शिवाजीचा सारा इतिहास, सांगतो आम्हास, सान थोरास,
देशधर्माचा ठेवा अभिमान, कुणि न जगी थोर ना सान
श्रेष्ठ मानवता धर्म जगी जाण ॥
चालेल
भेटा सर्वला क्रूर खानाची, निघाले मंडपात
प्रतापगडची माय भवानी हंसे मंदिरात ॥
जा बाळा जा यशशील या शुभकार्यात
बाहेरीलया खड्डा खणतो, तो पडतो ॥
काळीज उलटे त्या खानाचे, डाही कपटाचा
वा जशासी तैसा जगी हा धर्म मराठी ॥
दबकत दवकत सर्जा शिवाजी निघाले मंडपात
चिलखत अंगी वाघनखे ती भवानी दरम्यान ॥
चालेल
धन्य शिवाजी थोर, शूर बाणेदार, तय्यार,
खानाची रग जिरवायला, हिंदवी राज्य उभारणीला
मानाचा मुजरा शिवबाला
खानाचा बघुन अवतार,ची मणी गार, शिवाजी फार,
कधी प्रत्यक्ष दिसे नयनास, कसली सुटला घाम अंगास, नजीक
भवानीचे स्मरण समयास ॥
चालेल
दृष्टादृष्टी होती खानही, उठून उठली
ये बाळा ये आजकडकडून भेटू दे मजला ॥
कवळ मारिता दावा वळखला, श्रीशिवरायन
वाघनखांचे बसे तडाखा ओरडं कळवळून ॥
हिसक्यासरशी आला कोथळा बाहेर खानाचा
कृपा देवीची यशस्वी पुत्र जिजाऊचा ॥
जाताना एक शिरावर, वार करी खान
सारे मावळे तुरुंगातून, बेभान ॥.....
चालेल
जिवा उडवी हात बंदचा घाऊक
आला होता वार करण्यास दात खाऊन ॥
धडपासून वेगळ केल शिर, संभाजी कावजीन ॥
बुरुजात केल त्याच दफन, दोष विसरुन ॥
अफझुल्ला नांव बुरुजाला, दिलबानन
कबर बांधली किल्ल्यावर त्याची, शिवबनन छान ॥
हंडया झुंबर लावती व्यवसाय, उदबत्त्याचा वास दरवला ॥
कुराणीची वचनं लाविली, आतल्या बाजुला
उपन्न दिलं कबरीला , शत्रूचा मान राखला ॥
धन्य धन्य शिवराय जगी ॥
शिवाजीची गाईली मी कीर्ति, अशीच दिनराती, द्यावी मज स्फूर्ती,
दैवत हे पूज्य भरतखंडास, मुजरा शाहिरी सान थोरांस ॥
✶ ✶ ✶ ✶
अफजलखानाचा वध पोवाडा ३
सर्ग १ : चाल १
त्या दैत्य हिरण्य कश्यपूला, नरसिंहन भाला, जसा फाडिला,
शिवाजिन तोसा अफझुलखानास, फाडला प्रतापगडीं आणा ध्यानास ।
भवानी आई साह्य शिवबास ॥ध्रु०॥
चाल ५
हिंदू हिंदमातेचे केले ज्यानी नष्ट,
असे रावण कुंभकर्ण दैत्य फार बलिष्ठ आले पुन्हा जन्माला एक खरी ती गोष्ट,
रावण आणिंगजेब खरा, कुंभकर्ण पुरा, अफझुलखान स्पष्ट ॥
चाल १
त्या विष्णुरुपी शहाजीला, कपटान बोला, पकडुनी नेला,
विजापुराच्या आदिलशहानं, ठार मारण्याचा विचार करून,
खालीत चिरडाची आज्ञा दिली जाण ॥
चाल २
परी सर्व शिवाजीजा पुत्रानन, शाहास शह ॥
सोडविला पिता युक्तीनं, हे प्रसिद्ध जगतीं जाण ॥
दिल्लीपती शहाजहान । याच्याच थोर सह्यान ॥
चाल ३
इकडे ऐका प्रकार काय सांगतो तुम्हाला
महाराष्ट्रांत शिवाजिनन घातला धुमाकुळ साचा ॥
नुक दरबारीं प्रताप आपला दिमाखाचा ॥
दाविला शहाला बोकड म्हणून दाढीचा ॥
तोरणा पहा घातला पाया स्वराज्याचा ॥
असंगत भडकला क्रोध कादिलशहाचा
म्हणे कोण करील हार चुवांचा ॥
चालणे
प्रवाहां भवानी मातेनन, तुळजापुराच्या अंबाबाईन, लक्ष्मीला हांक मारुन,
शिवाजीला साह्य करण्याची आज्ञा दिली छान
लक्ष्मीचं साह्य शिवबाला, कसं ऐका त्या दोघा,
त्या तोरणा किल्ल्यावर भाला, द्रव्याचा साठा गोवसला शिवराजाला ॥
दिली सोडली ती नंद बेधडक, तेव्हा सुरतेला अन् कल्याणचा खजिना आणिला,
खर्चून द्रव्य प्रतापगड किल्ला बांधला ॥
मग मोठया भक्ति भावांन, भवानीला शक्ती, अशी घोर वार्ता ऐकून,
भडकलं शहाचं मन, दरबार त्यानं भरून, केला प्रश्न आदिलशहानं,
थर करिल पहाडका चुव तो वीर कोण ॥
चाल १
ऐकून असे हे बोल, बेताल, खान अफझूल,
ठार म्हणे करीन शिव्या सैतान,
शिवाजी कसा चिडिया का नाम, वीर मी बडा ओळखा अफझुलखान ॥
सर्ग २ : चाल १
ही वार्ता कळतां शिवबाला, तयार होई,
विचार करण्याला, भरविला राजगडीं दरबार,
जमविले सर्व वीर सरदार, जिजामाई त्यांत मुख्य आधार ॥
मोरोपंत पिंगळे नेताजी, जेधे कान्होजी, तेसाच तानाजी,
जिवा महाला तो खरा कल्याण, तोंच स्वामी समर्थ शिष्य कल्याण,
गर्जना ती शुभ कल्याण ॥
चाल २
संदेश रामदासांचा, कथिला त्यानी दरबारीं ॥
हे अरिष्ट खानाचे, नच जाण फक्त तुजवरी ॥
हे अरिष्ट धर्मावरती, येतसे देवळ येती ॥
चाल ३
ऐकून असा संदेश---
बंदोबस्त केला देवळांचा शिवाजीन खास ॥
तुळजापुरची भवानी ठेवली गुप्त जाग्यास ॥
पंढरपुरचा विठोबा चंद्रभाग पात्रांत ॥
दर्शनी मूर्ति स्थानास
आणि आपण केला मुक्काम प्रतापगडास
चालणे
खान आला तुळजापुरला, बलं भवानी देवीला,
जात्यात भरदुनी पीठ समयाला ॥
चाल १
अगणीत फौज संगतीला, देखिया आला, पंढरपुराला,
विठोबा भोला चढला गर्वास, बोलला किती मूर्ख
हिंदू हे खास, मानीती देव पहा दगडास ॥
चालणे
अफझुलखान बोलला आपण, किती मूर्ख हिंदू हे बोला,
तो देव दगडाला, आतां कुठं रं तुमचा देव गेला,
तो गेला हुतां ऐका तुम्हाला सांगतो
शिवाजीच्या अंगी भवानीन संचार केला ।
देवीन दृष्टांत दिला शिवबाला । दे बोकड बळी हा मला-
भिऊं नको उभी मी पाठीला सदा साह्याला ॥
(देवीन दृष्टांतावर शिवाजी राजानी अफझुलखानाशी सामना सामना रद्द केली)
चाल भेदीक
पश्चिमेस किल्ला ठेविले वीर मोरोपंत पिंगला ।
वीर कृष्ण पवार सुपेकर त्याच्या सह्याला ॥
पायदळ सारे कोंकण प्रांती घोडदळ नेताजीला ।
कान्होजी जेधे वीर टिकट कोयन त्या तीराला ।
स्वतः संगं तानाजी आणी दाखल जिवाजी महाला ॥
चाल १
कृष्णाजी नामें ब्राह्मण, खासा प्रधान, खानाचा जाण,
वलविला शिवाजीन त्या समयास, सांगे तोटा अफझुलखानास,
शिवाजी भाल्या, धनी आपणास ॥
चाल कटाव १
प्रतापगडाच्या माऱ्या खाली, जागा भेटीची त्यांनी ठरविली,
लष्करी अफझुलखानानी, सेना सारी दूरी,
फक्त हुजरे दोन यावंखीरी, भाल्या शिवाजी मेल्यावानी,
अशा तऱ्हेचा फांसा टाकूनी, मासा गळाला ओढला
शिवबानी, दहासले भागानी, हजारवी हजार मावतीं,
ठेवले कामावर मजूर म्हणोनी, भले दांडगे खंदक खुनी,
वेळ भेट मोजतो क्षणाचा
चाल दांगटी
मग विचार केला शिवबनन, यावा कोणत्याही, अफझुलखान,
आधींच पाहिलेला चांगला, म्हणून वेश पालटून,
बहिर्जी दलाली संगती, कधी तो होई तशेवाला,
कधीं कधीं शाहीर गोंधळी बनला, कवा कवा मोळीविक्याही,
कधी जाई खडी भाजीपाला । असा रोज चालला,
परी नाही खान त्या दिसला, गा ऐका तुम्ही दादा--
चाल १
एके दिवश आंबेखिल, वर जाण, चालला जलदीन,
आंब घ्या आंब आवाज दिला, वेष कसा दाखवा ऐका बावळा,
शिवाजी शोभे खरा मावळा
सर्ग ३ : चाल १
कंठी काला दोरा पायांमधें जाडजूड वहाणा,
थेट शेतकरी बाणा । काळींबळी खांद्यावरती काळी ते गंध,
डो मुंडास पगडबंदई । खाली भवतीं जाड करदोडा लंगोटी ।
डोईवर आंबी पाटी । गेला विकाया श्रीशिवरायाच्या धर्मासाठी
खरोखर राष्ट्र कार्यासाठी.
चाल ३
अंब्या मिषानं खानाला ठेवला कोणत्याही ।
कृष्णाजी वकील खानाचा फितूर करून ।
चकला शिवाजीनंद सरदार अफझुलखान ॥
चालेल
मग फक्त दोन वीरांना खानान यावंसील ठरलं त्या क्षणा ॥
चाल १
आशिवाद आईचाखिल, पोषाख, तयार जाण,
शिवाजी जाण्या गड्कुट, वीर वीरशाली,
जय विजय जणूं कालीं ॥
(छत्रपती शिवाजी महाराजानी पोषाख कसा केला होता)
चाल भेदीक
अंगमाजी चिलखत साऱ्या वज्र जाळीदार,
रुभरी बंडी घोळदार, बंडी हो, तंग आंगळदार ॥
डोईवरती पोलादाचे जाड शिरस्त्राण,
तरी साफा चढवून साफा चढवून हो,
भूताचा चढाव पायीं जाण ॥
मुसेजरी ती तुमान तंगदार कलाबूत,
रेशमी गोंडे झळकत, गोंडे झळकत हो,
मधोमध शोभा उघडवीत ॥
गुप्त हत्यारे वाघांत नखे ती डाव्या हात,
बिचवा उजव्या अस्तनीत, उजव्या अस्तनीत हो, भवानी डाव्या खालीवरत ॥
चाल १
अंबेच घ्या दर्शन, गेला जलदीन, हात जोडून,
प्रार्थना करी भवानीला । प्रसाद दे माते तुला,
भीत मी नाही कळिकाळा ॥
चालणे
भवानीच दर्शन, आशिर्वाद दिसले,
तानाजी जिवाजी जाण चालले संगती जाण,
शिवराया निघाला जलदीनन, सुरुवात डंका नौबत धडाड धूम ॥
'डंका'
दुडुम दुडुम नौबत, वाजली, दुडुम दुडुम नौबत ॥ध्रु०॥
चालला प्याराणा, शिवभूपगडगड जाणा,
रणभेरी वाजे दणा दुडुम ॥१॥
पुरुषा प्राणा, ते पुरुष खरे जगीं जाणा,
रक्षितात क्षत्रिय बाणा, दुडुम ॥२॥
जय देवी जय बोला, जय माय भवानी बोला,
जय शंकर श्री शिवभोला दुडुम ॥३॥
चाल १
उतरली स्वारी गजगती, गंभीर वृत्ती, समर्थी,
भालदार, चोपदार, करते जयजयकार, शिवाजी महाराज,
आते आहेत---आस्ते कदम निग्गा रख्खो महाराज ॥
॥ राजा श्री शिवाजी महाराज की जय
सर्ग-४ : चाल कटाव २
देख संग सय्यद बंडा, दावण्या शिवाजीला दंडा,
बांधी हाता मधें गंडा, अफझुलखान, जिवा महाला शिवाजीही,
स्वतःला लवलाही, जीवाशी जोडले पाही गहीं ॥
खुषही अफझुलखान बोलसे गर्वाने, वकीलासी तेव्हां जाण,
गेलाऊन भिडका चुवा भला, शिवाजी हा काफरही,
धाडतो आता स्वर्गाला मुंडी दाबून ॥
कडकडून मिठी मारी, मुंडक त्याचं दाबून धरी,
मणी म्हणे ढेकणापरी, टाकितो चिरडून ।
उपसुनिया कट्टयार, बरगडीत त्याच्या वार,
खूपसाचा यत्न करे, चपळाईनन ॥
चाल १
कपटासी करितसे कपट, शिवराया
सर्जा तो धीट, सोडुनी मुंडी आटोकाट ॥
चाल कटाव २
तुम्हीिया चपळाई बिचवा तुम लवलाही,
पोटामधे त्याचे पाहणे, खूपसून आंतडयाचा शोध,
पोटातुन बाहेर काढला, खान म्हणे अल्ला अल्ला, ये धाऊन.
पण त्यान जलदी करून, आपली तलवार ऊपसून,
वार केला शिवाजीवर, त्या जोराने ।
चुकविला शिवबननवार केला उलट प्रहार,
भवानी तलवार परजून ॥
चाल ३
वार आता करणार, तोच गेला शूर वीर,
जीवा महा नरवीर, तेव्हां धावून त्याचा हात,
फक्त एकाच धावात कलम केला हातोहात, मोठया शौर्यान ॥
४
होता जिवा म्हणुनिया शिवा,
वांचला इतिहास पहा, राष्ट्राचा जगविला ठेवा
चाल कटाव २
अफझुलखानहीर ठार, सय्यद बंडा केला गार,
शिवराया जिजाईचे, पाय धरुन ।
म्हणे तुझे पुण्य जबर, खान मोठा मातब्बर,
आलो करूनिया ठार, तू कृपेनन ॥
चाल १
तो धन्य शिवराय, धन्य जिजामाय,
भवानी साह्य, धन्य ती वद्य भवानी तलवार,
धन्य हा भारत धर्म साधार, धन्य शाहीर ॥
दीक्षित क्रांतिशाहीर, चिंचणीकर, बंधू मम प्रेम,
छोटा दीक्षित मी गातो कवनास, एकत्रही एकाच गुरुचे दास,
न्यायरत्न विनोद पूज्य आम्हास ॥
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Gele Jinkaya Te Gad Lyrics
- संभाजी महाराजांचा पोवाडा
- छत्रपति शिवजी महाराजांचा पोवाड़ा लिरिक्स
- Small Powada In Marathi Lyrics
तर आज या पोस्टमध्ये आपण अफजलखानाचा वध पोवाडे बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!
Post a Comment