Header Ads

Hridayi Vasant Fultana Lyrics | हृदयी वसंत फुलताना | अशी ही बनवा बनवी


नमस्कार मित्रानो , या पोस्ट मध्ये तुम्हाला Hridayi Vasant Fultana Lyrics वाचायला मिळतील. हे गाणं सुरेश वाडकर, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंग, सचिन, अनुराधा पौडवाल, अपर्णा मयेकर यांनी गायलेलं आहे. तर गाण्याचे लिरिक्स शांताराम नादगावकर यांनी लिहिले आहेत आणि अनिल मोहिले यांनी गाण्याला म्युझिक दिल आहे.


सॉन्ग - हृदयी वसंत फुलताना
मूव्ही - अशी ही बनवा बनवी (1988)
लिरिक्स - शांताराम नादगावकर
सिंगर - सुरेश वाडकर, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंग, सचिन, अनुराधा पौडवाल, अपर्णा मयेकर
म्यूज़िक - अनिल मोहिले



Hridayi Vasant Fultana Lyrics | Marathi

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे...

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..

मोहुनिया ऐसी जाऊ नको,
रोखुनिया मजला पाहू नको
मोहुनिया ऐसी जाऊ नको,
रोखुनिया मजला पाहू नको

गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे...
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे....
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे.....
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे....

पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय...
अवघी अवनी सजली धुंद मोहरली..
पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय...
अवघी अवनी सजली धुंद मोहरली..

उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे,
सौख्यात प्रेम-बंधांच्या हे अंतरंग न्हावे...
हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे...
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

मदभरा गंध हा प्रीतीचा दे गं मधुवंती हाय हाय ...
रंग तू सोड रे छंद हा मजसाठी...
मदभरा गंध हा प्रीतीचा दे गं मधुवंती हाय हाय ...
रंग तू सोड रे छंद हा मजसाठी...

हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा..
हे तीर ,चार नयनांचे देती आम्हा दिलासा...
जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे ..

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे..
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे...

हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे




हे पण वाचा 👇👇👇



तर मित्रानो , आज आपण Hridayi Vasant Fultana Lyrics बघितले . अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.