Header Ads

Aabhas Ha Lyrics (Marathi) | आभास हा | यंदा कर्तव्य आहे


नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Aabhas Ha Lyrics बघणार आहोत . हे गान " यंदा कर्तव्य आहे " या मराठी मूव्ही मधल आहे . तसेच राहुल वैद्य & वैशाली सामंत यानी हे गान म्हटलेल आहे . चला तर मग बघुया " आभास हा" या गण्याचे बोल -


सॉन्ग - आभास हा
मूव्ही - यंदा कर्तव्य आहे
लिरिक्स -अश्विनी शेंडे
सिंगर -राहुल वैद्य & वैशाली सामंत
म्यूजिक - नीलेश मोहर्रिर


Aabhas Ha Lyrics | Marathi

कधी दूर दूर कधी तू 
समोर मन हरवते आज का

का हे कसे होते असे 
ही आस लागे जीवा

कसा सावरू मी 
आवरू ग मी स्वत:ला

दिसे स्वप्‍न का हे 
जागतानाही मला

आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला

क्षणात सारे उधाण वारे,
 झुळुक होऊन जाती

कधी दूर तूही जवळ वाटे 
पण काहीच नाही हाती

मी अशीच हासते उगीच
 लाजते पुन्हा तुला आठवते

मग मिटून डोळे तुला पाहते
तुझ्याचसाठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला

मनात माझ्या हजार शंका, 
तुला मी जाणू कसा रे

तू असाच आहेस तसाच नाहीस 
आहेस खरा कसा रे

तू इथेच बस ना हळूच हसना
 अशीच हवी मला तू

पण माहीत नाही मलाही 
अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला



हे पण वाचा :



मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Aabhas Ha Lyrics बघितले. गण्याच्या लिरिक्स मध्ये काही मिस्टेक असेल तर ते मला कमेंट मध्ये सांगा आणि अधिक गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.




धन्यवाद !!!!!




1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.