Header Ads

Pahilya Divashi Janmale Bal Lyrics In Marathi | पहिल्या दिवशी जन्मले बाळ लिरिक्स


नमस्कार मित्रांनो !!! स्वागत आहे तुमच True Marathi Lyrics वर. आज आपण Pahilya Divashi Janmale Bal Lyrics In 
Marathi बघणार आहोत .

Pahilya Divashi Janmale Bal Lyrics

पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ
कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो….॥धृ॥

दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग
जसा झळकतो आरशाचा भिंग..॥२॥

तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठा
खारीक खोबरं साखर वाटा ..॥३॥

चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेनं वाजविली टाळी
कृष्ण जन्मला यमुना तळी ...॥४॥

पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा लिंबू नारळ देवीला फोडा
तान्ह्या बाळाची द्रुष्ट गं काढा…॥५॥

सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा
चला यशोदा आपुल्या घरा...॥६॥

सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल
यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोलं ..॥७॥

आठव्या दिवशी आठवीचा थाट भूलल्या गवळणी तीनशे साठ
श्री कृष्णाची पाहतात वाट …॥८॥

नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्ह्या बाळाने घेतला छंद
वासुदेवाचा सोडवावा बंध …॥९॥

दहाव्या दिवशी भाग्येची रात तेहतीस कोटी देव मिळूनी येती
उतरून टाकती माणिक मोती ….॥१०॥

अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले
मथुरा नगरीत देवकीचे हाल ....॥११॥

बाराव्या दिवशी बाराच नारी पाळना बांधिला यशोदा घरी
त्याला लावली रेशमी दोरी .॥१२॥

तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी
गवळणी संगे लावितो खळी ….॥१३॥

चौदाव्या दिवशी तोफा गर्जती शंकर पार्वती नंदिवर येती
बाळाच्या डोळ्यात काजळ घालती ॥१४॥

पंधराव्या दिवशी नौबत वाजे श्रीकृष्णावरती घातला साज
यशोदा मातेला आनंद आज …॥१५॥

सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला
श्रीकृष्णाचा पाळणा गायीला जो बाळा जो जो रे जो...॥१६॥

* * * * *



हे पण वाचा 👇👇👇


आज आपण Pahilya Divashi Janmale Bal Lyrics In Marathi बघितले. अश्याच लिरिक्स च्या पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट दया .

धन्यवाद 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.