Header Ads

काय करावं या उन्हाचं बालगीत Lyrics | Kay Karav Ya Unhach



नमस्कार या पोस्टमध्ये आपण भूक लागली बाळाला बालगीत Lyrics बघणार आहोत.

____________________

🌞काय करावं या उन्हाचं बालगीत Lyrics🌞

तापलेला सूर्य डोक्यावरी..
चाललो चार पावलं जरी ..
थेंब पडतात घामाचे...
टपा टपा टपा...
काय करावं या उन्हाचं
सांगा पटा पटा पटा...

दुपारी अंगाची लाही लाही
Light मध्येच येई जाई..
पंखा सतत फिरे बिचारा..
फटा फटा फटा..
काय करावं या उन्हाचं
सांगा पटा पटा पटा...

उन्हाने हे अंगण तापे..
चपले विना पाय भाजे...
नाजूकशी पावले पडी
चटा चटा चटा...
काय करावं या उन्हाचं
सांगा पटा पटा पटा...

थोडसं बोललो जरी
घसा अगदी कोरडा होई..
पाण्याचे पेले होतात
गटा गटा गटा....
काय करावं या उन्हाचं
सांगा पटा पटा पटा...

असा कसा हा उन्हाळा
आणतो अगदी कंटाळा
पण आंब्याच्या फोडी दिसताच
विसर पडतो सगळा...
हाच उपाय या उन्हाला करा... 
चट्टा मट्टा...

* * * * * *
_____________________

✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_____________________

👀आज या पोस्टमध्ये आपण भूक लागली बाळाला बालगीत Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!

_____________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.