Header Ads

सोन्याची नगरी शिर्डी गावाला Lyrics | Sonyachi Nagri Shirdi Gavala



नमस्कार या पोस्टमध्ये आपण सोन्याची नगरी शिर्डी गावाला Lyrics बघणार आहोत.

____________________

🌹सोन्याची नगरी शिर्डी गावाला Lyrics 🌹

सोन्याची नगरी शिर्डी गावाला
साईबाबा माझा प्रगट झाला
ओम साई नावाचा गजर केला
न खांद्यावर घेतले साईबाबाला .. ||धृ ||

पाई पालखीला येतात तुझं दर्शन घेयाला
तुझं दर्शन घेयाला..
तुला बघून रं साई हर्ष वाटत हृदयाला..
हर्ष वाटत हृदयाला..
कसाऱ्याचा गो ये रस्त्याला विसावा घेती शीतल छायेला
ओम साई नावाचा गजर केला
न खांद्यावर घेतले साईबाबाला .. ||1 ||

तूच साई माझा देव देतो आधार जीवनाला
देतो आधार जीवनाला
सारीकृपा तुझी रं बाबा सुखी ठेवते भक्ताला
कडुलिंबाचा गोडवा झाला साई भक्तीचा अमृत प्याला
ओम साई नावाचा गजर केला
न खांद्यावर घेतले साईबाबाला .. ||2 ||

तुझी कृपा र साईबाबा
सदा पाठीशी आमच्या हाय
वेड लागले साई नावाचं आम्हा भीती कशाची नाय
ओम साई शाम साई राम साई बोला
हृदयात बसलाय साईनाथ भोला
ओम साई नावाचा गजर केला
न खांद्यावर घेतले साईबाबाला .. ||3 ||

* * * * * *
____________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
____________________


👀आज या पोस्ट मध्ये आपण सोन्याची नगरी शिर्डी गावाला Lyrics बघितले

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.