भरली पंढरी रंगे विठूचा सोहळा Lyrics | Bharali Pandhari Range Vithucha Sohala
सॉंग - रंगे विठूचा सोहळा
लिरिक्स - सानिका म्हसकर
सिंगर - अद्योत साईगावकर, गौरी डोंगरे
म्युझिक - ऋत्विक तांबे, श्रेयस कांबळे
_______________________
🌷भरली पंढरी रंगे विठूचा सोहळा Lyrics🌷
आस लागली नामाची भक्त येई माहेरा
अशी भरली पंढरी रंगे विठूचा सोहळा... || धृ ||
हाती चिपळ्या कुणाच्या,
कुणा हाती बोले टाळ
माय घाली ते फुगडी,
विठू विठू गातयं बाळ
भजनाच्या तालावर विठू अवतरला
अशी भरली पंढरी रंगे विठूचा सोहळा
आस लागली नामाची भक्त येई माहेरा.. || १ ||
ओटी जनाईची ओवी
मनी तुकोबाची कळ
विटेवरी देव माझा
माझी त्याची एक नाळ
इंद्रायणी ओसंडली...
देह एक जाहला
अशी भरली पंढरी रंगे विठूचा सोहळा
आस लागली नामाची भक्त येई माहेरा.. || २ ||
|| विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल || ... (*३)
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ... (*३)
* * * * *
_______________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- वारी चालता पांडुरंग भेटला Lyrics
- अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर Lyrics
- सखुबाई जनाबाई आल्या नेसून लुगडी Lyrics
- छंद सोडू नको देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा Lyrics
_______________________
👀आज या पोस्टमध्ये आपण भरली पंढरी रंगे विठूचा सोहळा Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
_______________________
Post a Comment