तुळशी विवाह मंगलाष्टक मराठी | Tulsi Vivah Mangalashtak Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुळशी विवाह मंगलाष्टक मराठी बघणार आहोत.
____________________________
तुळशी विवाह मंगलाष्टक मराठी | Marathi
स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम, मोरेश्वरम सिद्धिदम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम, चिन्तामणि स्थेवरम ||
लेण्याद्रिम गिरिजात्मकम सुरवरदम, विघ्नेश्वरम् ओझरम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मंगलम || १ ||
गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।
गोत्रे भिन्न परस्पराहूनही तशी
की भिन्न ज्यांची कुळे जीवे एकची होते ती वर वधू |
आजन्म ज्यांच्यामुळे तेये ईश कृपे घडून सदनी ||
मांगल्य वैवाहिक दांपत्य चिरनित्य शंकर कृपे |
कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान || ३ ||
सिताराम पती दिसेच जगती |
चंद्राप्रती रोहिणी सावित्री पती सत्यवान जानूकी ||
नारायणा लक्ष्मी झाली रुक्मिणी मालिका सुक्रे |
स्वानंद बन्सीधरा तैसी शोभे सरस्वती गणपती
कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान || ४ ||
आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा |
गृहतके मधुपर्क पूजन करा अंतपटाते धरा ||
दृष्टा दृष्ट वधू-वरा न करता दोघे करावी उभी |
वाजंत्री बहु गलबला न करणे |
कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान || ५ ||
* * * * * *
__________________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा
__________________________
आज या पोस्टमध्ये आपण तुळशी विवाह मंगलाष्टक मराठी बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!
__________________________
Post a Comment