सोड रे सोड हरी रीत ही नाही बरी Lyrics | Krishnachi Gavlan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण सोड रे सोड हरी ही रीत नाही बरी Lyrics बघणार आहोत. राधा कृष्णाची खूपच सुंदर ही गवळण आहे.
सोड रे सोड हरी ही रीत नाही बरी Lyrics | Marathi
सोड रे सोड हरी रीत ही नाही बरी
गाऱ्हाणी वरचे वरी नाही गवळ्यांच्या करी
सोड रे सोड हरी...|| धृ ||
जाता गवळणी बाजाराला
पाठी जाऊनी तू गोपाळा
देशी पिचकारी संग.. मारुनी लाल रंग
उडवीशी अंगावरी रीतही नाही बरी..
सोड रे सोड हरी...|| १ ||
खडा मारूनी करी खोडी
घडा भरल्या दुधाचा फोडी
लाज कशी ना थोडी.. झोंबूनी पदरा ओढी
अडवूनी वाटेवरी रीतही नाही बरी..
सोड रे सोड हरी...|| २ ||
बसता गवळणी आंघोळीला
संधी साधूनी नंदलाला
चोरूनी लुगडी त्यांची
यमुनेच्या काठावरती ठेवीशी कळंबावरी
रीतही नाही बरी..
सोड रे सोड हरी...|| ३ ||
घेऊनी गोपाळांचा मेळा
आडवी गवळणी वेळोवेळा
नाचाया लावी सकला
भुलवणी भोळ्या अबला
मुरलीने धुंद करी रीत ही नाही बरी..
सोड रे सोड हरी...|| ४ ||
* * * * *
या गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇
- येते माघारी जरा थांब रे कान्हा गवळण Song Lyrics
- वाजव ना तुझी मधुर बासरी Lyrics
- अलीकडे गोकुळ पलीकडे मथुरा गवळण Lyrics
- चल ना राधे माझ्या गावाला गवळण
आज या पोस्टमध्ये आपण सोड रे सोड हरी ही रीत नाही बरी Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
Post a Comment