Header Ads

घ्याल का हो राया एक शालू बनारसी Lyrics | Ghyal Ka Ho Raya Ek Shalu Banrasi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण घ्याल का हो राया एक शालू बनारसी Lyrics बघणार आहोत.

घ्याल का हो राया एक शालू बनारसी Lyrics | Marathi

जड वाटे भारी मजला मागु कशी
मनातलं सारं माझ्या सांगू कशी
घ्याल का हो राया... एक शालू बनारसी.. (२ )

पान विडा देते करुनी, धुंद यौवनाचा
आत घातला मी कात, मस्त मदनाचा
मारू नका पिचकारी पच दिशी... (२)
घ्याल का हो राया... एक शालू बनारसी.. (२ )

तुमच्यासाठी राया किती सोसला मी त्रास
बोलले नवस किती केले उपवास
जवळ नका येऊ सुटल एकादशी
घ्याल का हो राया... एक शालू बनारसी.. (२ )

होईल कधी मी तुमच्या पायाची दासी (२)
घ्याल कधी ओढून मजला हृदयाच्या पाशी
कोवळ्या ओठांवरती फिरवा लाडकी मिशी
घ्याल का हो राया... एक शालू बनारसी.. (२ )


चंदनाच्या पलंगावरती मोगऱ्याची शेज
अंथरली माया खाली, सोडली मी लाज
माने खाली ठेवा डाव्या हाताची उशी (२ )
घ्याल का हो राया... एक शालू बनारसी.. (२ )

* * * * * *




आज या पोस्टमध्ये आपण घ्याल का हो राया एक शालू बनारसी Lyrics बघितले. पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.