Header Ads

किती सांगू मी सांगू कुणाला भक्ती गीत Lyrics | Kiti Sangu Mi Sangu Kunala



नमस्कार या पोस्टमध्ये आपण किती सांगू मी सांगू कुणाला भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.

किती सांगू मी सांगू कुणाला भक्ती गीत Lyrics | Marathi

किती सांगू मी सांगू कुणाला |
आज आनंदी आनंद झाला || धृ ||

अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी
गोड हसू गालात, नाचू गाऊ तालात
पैंजन थरथरले कान्हा दिसतो उठून
गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला
आज आनंदी आनंद झाला... || १ ||

मूर्ती अशी साजरी ग
ओठावरी बासरी भुलले सुरा संगती
कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ
कान्हाला नावे किती
रोज खोड्या करून बाळ गोपाळ जमून
सांज सकाळी गोपाळकाला
आज आनंदी आनंद झाला... || २ ||

खेळ असा रंगला ग खेळणारा दंगला
टिपरीवर टिपरी पडे लपून-छपून गिरिधारी
मारतो का पिचकारी रंगाचे पडती सडे
फेर धरती दिशा धुंद झाली निशा
रास रंगाच्या धारांत न्हाला...
आज आनंदी आनंद झाला... || ३ ||






हे भक्ती गीत पण नक्की वाचा 👇👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण किती सांगू मी सांगू कुणाला भक्ती गीत Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.