Header Ads

Fu Bai Fugadi Fu Lyrics | संत तुकाराम महाराजांचे प्रसिद्ध भारूड


नमस्कार या पोस्टमध्ये आपण Fu Bai Fugadi Fu Lyrics बघणार आहोत.



Fu Bai Fu ugadi Fu Lyrics | Marathi

फु बाई फु फुगडी फु दमलास का रे
माझ्या गोविंदा तु रे गोविंदा तु || धृ ||

स्वतःचा बाप आला घेई त्यासी घरात |
नवऱ्याच्या बापाला थांबा म्हणे दारात |
आता फु बाई फु फुगडी फु... || १ ||

स्वतःची आई आली खाया देते लोणी |
नवऱ्याच्या आईला भरा म्हणे पाणी ||
आता फु बाई फु फुगडी फु... || २ ||

आला आपला भाऊ देते खोबऱ्याची वाटी |
नवऱ्याच्या भावाला घेऊन मारी काठी ||
आता फु बाई फु फुगडी फु... || ३ ||

आली आपली बहीण तिला घे नवी साडी |
नवऱ्याच्या बहिणीला म्हणे आली वेडी ||
आता फु बाई फु फुगडी फु... || ४ ||

आली आपली वहिनी तिला गोड गोड बोला |
नवऱ्याच्या वहिणीला टोचून बोले ||
आता फु बाई फु फुगडी फु... || ५ ||

स्वतःच्या लेकराला घेऊन मिरवीकडे |
जावेच्या लेकराला म्हणे उताडे ||
आता फु बाई फु फुगडी फु... || ६ ||

माहेरचं गोत आलं आनंदात पळे |
सासरच होत आलं मोडी ना डोळे ||
आता फु बाई फु फुगडी फु... || ७ ||

सासुबाई म्हणे कशी झाली मला चोरी |
कशी हो बदलली दुनिया सारी ||
आता फु बाई फु फुगडी फु... || ८ ||

एका ज्योतीने भारुड हे केलं |
सद्गुरू चरणी मस्तक ठेविले ||
आता फु बाई फु फुगडी फु... || ९ ||

⸭ ⸭ ⸭ ⸭ ⸭




हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण Fu Bai Fugadi Fu Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.