Header Ads

Aai Mazya Lagnachi Ga Lyrics | आई माझ्या लग्नाची ग



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Aai Mazya Lagnachi Ga Lyrics बघणार आहोत. उषा मंगेशकर यांनी हे गीत गायलेलं आहे.


सॉंग - आई माझ्या लग्नाची
सिंगल उषा मंगेशकर
लिरिक्स राजेश मुजुमदार
म्युझिक राम लक्ष्मण
लेबल सारेगामा इंडिया लिमिटेड



Aai Mazya Lagnachi Ga Lyrics | Marathi

आई माझ्या लग्नाची ग
का तुलाच पडली घाई...
बाबा माझ्या लग्नाची हो
का तुम्हास पडली घाई...
कुणीतरी समजवा ना बाई
माझं वय काही झालंच नाही...

झाली का हो डोईजड मी
अशा कोवळ्या वयात
नुकतच पहिलं पाऊल पडलं
तरुणपणात तरुणपणात
ओठ दुधाचे सुकले काय
कुठे मी चुकले

माझं मलाच कळल नाही
हौस न मजला नटण्याची
अहो मी तर साधी भोळी
हवी कशाला इतक्यातही
साडी अन चोळी,
ही साडी अन चोळी

गाठ कशी बाई सुटली
नको तिथही तुटली
कोडं मलाच सुटलं नाही

काल रातीच्या स्वप्नामंदी
एक पाहिली वरात
आज कशी मी अवचित आले
आले ज्वानीच्या भरात

सांग कुठे मी लपवू
नजर कशी मी चुकवू
जो तो मलाच निरखून पाही

आई माझ्या लग्नाची ग
का तुलाच पडली घाई...
बाबा माझ्या लग्नाची हो
का तुम्हास पडली घाई...
कुणीतरी समजवा ना बाई
माझं वय काही झालंच नाही...

* * * * *



आज या पोस्टमध्ये आपण Aai Mazya Lagnachi Ga Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.