सेवा केलीच नाही जिवंतपणी Lyrics | Seva Kelich Nahi Jivantpani
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण सेवा केलीच नाही जिवंतपणी Lyrics बघणार आहोत.
सेवा केलीच नाही जिवंतपणी Lyrics | Marathi
सेवा केलीच नाही जिवंतपणी,
मेल्यावरती रडून काय फायदा || धृ ||
गुण गायले नाही जीव असता,
मेल्यावर बडबडूनी काय फायदा
तहानलेल्या जीवा पाणी ना पाजीले,
भुकेल्यास कधी ना अन्न दिले |
आपल्या नावासाठी कीर्ती कारणे
अन्नदान करुनी काय फायदा || १ ||
खुश होती कोणी पिंडदान करून,
असे कावळा भुकेला शिवतो म्हणून |
नंतर सखे सोयऱ्यांच्या पंगतीमध्ये,
बुंदी बासुंदी वाढून काय फायदा || २ ||
चारीधाम फिरून केले गंगेला स्नान,
पापे जातील धुवून केले पुण्याचे काम |
आई बापाला ठेवून वृद्धाश्रमा
भक्त तिर्थे फिरूनी काय फायदा || ३ ||
कळाली ना किंमत ते असल्यावरी,
ठेवले सरणावर जीव नसल्यावरी |
शेवटी मृतदेहाच्या तोंडामध्ये,
पाणी अंगठ्याने सोडूनी काय फायदा || ४ ||
रंजल्या गांजल्यांची जो सेवा करी,
धन्य आहे तो मानव या भुईवरी |
जो माणूस कोणाच्या कामी ना पडे,
त्याचे असूनी नसूनी काय फायदा || ५ ||
स्वप्निल येऊनी मायबाप बोलले असे,
बाळा करावे जसे लागे भरावे तसे |
माझ्या लेकरा आता आम्हा फुले वाहूनी,
हात फोटोला जोडूनी काय फायदा || ६ ||
सेवा केलीच नाही जिवंतपणी,
मेल्यावरती रडून काय फायदा || धृ ||
* * * * * *
खालील भक्तिगीते पण जरूर वाचा 👇👇👇
- असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे Lyrics
- मोजता येत नाही जगाच्या मापन Lyrics
- जीवाला विसावा दुखी संसारातून Lyrics
- नाशवंत हा देह मानवा जाईल धरती खाली Lyrics
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment