आज मला निराळच झालं कसं गवळण Lyrics | Gavlan Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण आज मला निराळच झालं कसं गवळण Lyrics बघणार आहोत.
आज मला निराळच झालं कसं गवळण Lyrics
आज मला निराळच झालय कसं ?
बाई बाई होतंय कसं?
मला ग बाई भरला येडं पिसं... || धृ ||
पाणी भरत होते मी पाणवठ्यावरी
पाठीमागे येऊनी याने,
ओढली माझी येणी..
मला बाई याचं गं आलंय हस...
बाई बाई आलय हस.. मला ग बाई .. || १ ||
नहात मी होते यमुनेच्या तीरी
अवचित आला बाई तुझा मुरारी
मला बाई गालात आलय हस
बाई बाई आलय हस... मला ग बाई ..|| २ ||
एका जनार्दनी तो श्रीहरी
सर्वांच्या चित्ताची करितो चोरी
गोकुळामध्ये बाई हे घडलं कसं
बाई बाई घडलं कसं.. मला ग बाई .. || ३ ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- रोज रोज छळतय यशोदे Lyrics
- वेडी झाली राधा ऐकून बासरी Lyrics
- बसले मी होते रंग महाली गवळण Lyrics
- खेळाचे भय वाटे गवळण Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण आज मला निराळच झालं कसं गवळण Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!
Post a Comment