पवित्र ते कुळ पावन तो देश अभंग | Pavitra Te Kul Paavan To Desh Abhang
नमस्कार या पोस्टमध्ये आपण पवित्र ते कुळ पावन तो देश अभंग बघणार आहोत.
पवित्र ते कुळ पावन तो देश अभंग
पवित्र ते कुळ पावन तो देश |
जेथे हरीचे दास जन्म घेती || १ ||
कर्मधर्म त्यांचा झाला नारायण |
त्यांचे नी पावन तिन्ही लोक || धृ ||
वर्ण अभिमाने कोण झाले पावन |
ऐसे द्या सांगून मज पाशी || ३ ||
अंत्य जादी योनी तरल्या हरी भजने |
तयांचे पुराने भाट झाली || ४ ||
वैश्य तुळा धार गोरा तो कुंभार |
धागा हा चांभार रोहिदास || ५ ||
कबीर मोमीन लतिफा मुसलमान |
सेना न्हावी जाण विष्णुदास || ६ ||
कान्होपात्रा खोदू पिंजारी तो दादू |
भजनी अभेदू हरीचे पायी ||७ ||
चोखामेळा बंका जातीचे महार |
त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी || ८ ||
नाम्याची जणी कोण तीचा भाव |
जेवी पंढरी राव तियेसवे || ९ ||
मैराळ जनक कोण कुळ त्याचे |
महिमान तयाचे काय सांगो || १० ||
यातायाती धर्म नाही विष्णू दासा |
निर्णय हा ऐसा वेदशास्त्री || ११ ||
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ |
तारीले पतीत तेने किती || १२ ||
☸ ☸ ☸
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
- होईन भिकारी पंढरीचा वारकरी अभंग Lyrics
- नाम तुझे रे नारायणा अभंग गीत
- वचन ऐका कमळापती अभंग Lyrics
- संत तुकाराम महाराजांचे अभंग
आज या पोस्टमध्ये आपण पवित्र ते कुळ पावन तो देश अभंग बघितला.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment