ऋतु मराठी कविता ( इयत्ता पाचवी ) | Rutu Kavita Marathi
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण ऋतु मराठी कविता बघणार आहोत. हि कविता बालभारतीच्या जुन्या अभ्यासक्रमात अभ्यासाला होती.
ऋतु मराठी कविता
झुळझुळ वारे वाहू लागले
लाल पालवी तरुंवरी
फुला फुलांनी लावल्या वेली,
आंबे राई मोहरली
आभाळाचे निळे निळे पण,
कुहू कुहू कोकिळा करी.
वसंत आला घरोघरी !
ग्रीष्म पातला, सूर्य तापला,
ऊन कडक जिकडे तिकडे
खूप तापते जमीन तिजवर
जागोजागी पडती तडे
गरम झळांच्या ऐन दुपारी
छाया शोधीती गुरे पाखरे
उन्हात खेळू नका बरे !
वारे सुटले मेघ उसळले,
गडगडती ते आभाळी !
बीज कडकडे लखलख करूनी
सर सर सर वर्षा आली
सुटे मातीचा वास चहूंकडे ,
कागद-होड्या सोडायची
पावसात किती मौज असे !
शरद येई मेघ पळाले
गुबगुबीत जणू पळति ससे !
कुरणे हिरवीगार चहूंकडे,
हिरवे हिरवे मळे तसे.
हिरवी झाडे, हिरवी शेते,
तुडुंब भरले तळे निळे.
चांदण्यात वाटे बागडावे !
हेमंताचे दिवस पातले
बरे हुडहुडी अंगात
शेतकऱ्याची गोफन फिरते
गरगर भरल्या शेतात.
हवे हवे से ऊन वाटते,
शेकोटीच्या भवती रात्री.
गप्पांना भरती येते !
उदासवाना शिशिर ऋतू ये,
पाने पिवळी पडती.
सोसाट्याच्या वाऱ्यासंगे
झर झर झर झर गळती
जडून पाने झाडे सगळी
केविलवाणी दिसतात
पाचोळा उडतो वाऱ्यात !
सहा ऋतूंचे चाक फिरतसे,
शिशिर ऋतू ही जाईल तेव्हा
वसंत सांगे हळूच ' मीही येतो
मागोमाग पाहा ! '
§ § § §
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण ऋतु मराठी कविता बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
Post a Comment