Header Ads

श्रावणातील कविता संग्रह | Shravan Kavita Marathi


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics  वर !!!!!!! आज या पोस्ट मध्ये तुम्हाला श्रावणातील कवितांचा संग्रह वाचायला मिळेल. श्रावण सुरु होऊन खूप दिवस झाले आहेत. अशा श्रवणावर आधारित कवितांशिवाय श्रावण महिनाच अधुरा वाटतो. चला तर मग बघूया श्रावण महिन्यातील कविता -

    श्रावण

    सुख वेचीन म्हणण्या आधी
    घन दुःखांच गहिवरतो
    अन दुःख सावरू जाता
    कवडसा सुखाचा येतो
    या ऊन सावली संगे
    रमण्यात ही मौज म्हणुनी
    मी हसून हल्ली माझ्या
    जगण्याला श्रावण म्हणतो

    - गुरु ठाकूर

    ❖ ❖ ❖


    आला श्रावण श्रावण

    आला श्रावण श्रावण
    संगे पाऊस घेऊन
    चिंब जाहले हे मन
    त्या सरित न्हाऊन

    धरणीशी नाते जुने पर्जन्य राजाचे
    सृष्टीस या पडे स्वप्न नव्या सौंदर्याचे
    वाऱ्याच्या गारव्याने अंग शहारले सारे

    एका सुखात क्षणाने बघ चित्त माझे भरे
    शब्दही हा सांगे झाला आनंद तयास
    याला शब्द उत्साहाने या श्रावणाचा साज

    - मानसी

    ❖ ❖ ❖


    आला श्रावण आला श्रावण

    आला श्रावण आला श्रावण,रंग फुलांचे घेऊनी
    वसुंधरा ही नटली, हिरवा शालू लेऊनी
    कधी सोनेरी ऊन पिवळे, इंद्रधनुचे रंग सुरेख
    कधी काळोखा रंग चढे, कधी शुभ्र ढगाळ चांदणे

    बरसणाऱ्या धारा कधी, रिमझिमनाऱ्या सरी
    ऊन पावसाचा खेळ घेऊनी, आला श्रावण मनोहर
    घेऊन सणांची रेलचेल, व्रतवैकल्याची उठा ठेव
    भक्तीचा हा रंग चढवूनी
    आला श्रावण, आला श्रावण ...

    ❖ ❖ ❖



    श्रावण महिना

    आला श्रावणाचा महिना
    चला माहेरी जाऊया
    चला सखीला भेटूया
    झोका झाडाचा खेळूया

    आला श्रावणाचा महिना
    तुझ्या नारळी पुनवेची
    जाऊ सागरी किनारी
    वाहू नारळ देवाला

    आला श्रावणाचा महिना
    भाऊ येरे मला न्याया
    राखी पुनवेचा सण
    राखी बांधूया भावाला

    आला श्रावणाचा महिना
    मंगळागौर ही आली
    करू जागर देवीचा
    खेळू झिम्मा फुगडी

    आला श्रावणाचा महिना
    कृष्ण जन्म हो झाला
    दही भाताचा प्रसाद
    दहीहंडी फोडू चला

    आला श्रावणाचा महिना
    आस माहेरी जाण्याची
    आला भाऊ हो न्याया
    ओढ माहेरी जाण्याची

    आला श्रावणाचा महिना
    चला माहेरी जाऊया
    श्रावणाचे सणवार
    सारे साजरे करूया

    आला श्रावणाचा महिना
    चला माहेरी जाऊया
    चला सखीला भेटूया
    झोका झाडाचा खेळूया

    - नयना थिटे

    ❖ ❖ ❖

    श्रावण सरी

    आला श्रावणाचा मास, शोभे रंगछटा खास
    हिरवळे वसुंधरा, इंद्रधनु आकाशास
    सरसर येती सरी, मेघराज नाचे वरी

    शनी काळवंडे सारे, क्षणातच ऊन दारी
    बांधे झोका झाडावर, हाऊस भारी हिंदोळ्याची

    आल्या माहेरवाशीनी, पूजा मंगळागौरीची
    भिजताना पावसात, मोहरती मन मोर
    शांत होऊन आनंदे, अनुभवे सान थोर

    - उषा देशपांडे

    ❖ ❖ ❖

    श्रावण आला ग

    झोका मंद झुरे, श्रावण आला ग ..
    मन कसे दरवळे, साजन आला ग
    बहर फुलांचे अंगी ओले, पाण्याचे नभ रंगित झाले
    मन कसे दरवळे साजन आला ग

    स्पर्श सुखांची चाहूल आली,
    विज लोचने जागी झाली
    मनी मनी सळसळे,साजन आला ग
    श्रावण आला ग ...

    थेंबांची का नवखी थरथर
    गत जन्मीचे सुर ना वर
    सुख उरी डूचमळे, श्रावण आला ग..
    झोका मंद झुरे, श्रावण आला ग ..

    ❖ ❖ ❖




    हे पण नक्की वाचा 👇👇👇


    तर आज आपण श्रावणातील कवितांचा संग्रह बघितला. अधिक मराठी लिरिक्स आणि कवितांसाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

    पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.