तळहाताचा पाळणा Lyrics | तळहाताचा पाळणा संग्रह ( मंगलाष्टके )
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण तळहाताचा पाळणा Lyrics मराठी मधून बघणार आहोत. हे मुलीच्या लग्नाच्या वेळी म्हणायची मंगलाष्टके आहेत.
तळहाताचा पाळणा Lyrics
🌷🌷🌷👧👧🌟👬🌟👧👧🌷🌷🌷
तळहाताचा पाळणा - १
तळ हाताचा पाळणा दोन्ही डोळ्यांचा आईना |
डबेतील कस्तुरी जशी वागवली मैना || १ ||
लाडाची लेक बाई हारवून साजणी |
आज माहेर सोडूनी कशी चालली सासरी||२ ||
जेव्हा त्याला जीव हो आम्ही केला तुमच्या हवाली |
आता तुम्ही मायबाप हिच्या जीवाची सावली ||३ ||
जीव खाली वर होतो तुला पाठविता राणी |
एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी ||४ ||
⸎ ⸎ ⸎ ⸎ ⸎
तळहाताचा पाळणा - २
टाका अक्षदा प्रेमानं
शुभ मंगल सावधान ...
दुडू दुडू धावायची .. ही अंगणी
आज पित्याची हो माया
तिच्या ओसंडे नयनी
छोट्या भावासाठी कंठ
तिचा आला हो दाटून
टाका अक्षदा प्रेमानं
शुभमंगल सावधान .....
माय दुरूनी पाहते
घाली तुळशीला पाणी
आठविता बालपण
अश्रू दाटले हो नयनी
माया पाझरली तिची
डोळे पुसूनी पदरानं
टाका अक्षदा प्रेमानं
शुभमंगल सावधान .....
आज मंगल या दिनी
डोई अक्षदा पडती
बंधू बहिणीची माया
तिजला हो रडविती
सुखी ठेव वधूवरा
देवरायाशी मागणं
टाका अक्षदा प्रेमानं
शुभमंगल सावधान ...
⸎ ⸎ ⸎ ⸎ ⸎
तळहाताचा पाळणा - ३
भावाला दूर ठेवू नको तू
बहिणीला परक मानू नको तू
आठवण ठेव तूभावा-बहिणीची
साजली जन्मा जन्मी ची जोडी
आईची माया अंगावर ठेव तू
बापाची छाया विसरू नको तू
आठवण ठेव तू आई बापाची
साजली जन्मा जन्मी ची जोडी
नवऱ्याच्या आज्ञेत राह तू
सासू-सासर्यांच्या सेवेत राह तू
आठवण ठेव तू माहेराची
साजली जन्मा जन्मी ची जोडी
कुर्यात सदा मंगलम सावधान
कुर्यात सदा मंगलम सावधान
कुर्यात सदा मंगलम सावधान
सावधान सावधान सावधान !!!!!!
⸎ ⸎ ⸎ ⸎ ⸎
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Marathi Mangalashtak Lyrics
- Beautiful Ukhane For Female
- Mothe Ukhane In Marathi
- लग्नाची आणि हळदीची पारंपारिक गाणी
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment