Ratris Khel Chale Lyrics | रात्रीस खेळ चाले
नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Ratris Khel Chale Lyrics बघणार आहोत . हे गान " हा खेळ सावल्यांचा " या मराठी मूव्ही मधल आहे . चला तर मग बघूया " रात्रीस खेळ चाले " या गाण्याचे बोल -
सॉन्ग -रात्रीस खेळ चाले
सिंगर - महेंद्र कपूर
लिरिक्स- सुधीर मोघे
म्युझिक डायरेक्टर - हृदयनाथ मंगेशकर
मूव्ही - हा खेळ सावल्यांचा (1976)
Ratris Khel Chale Lyrics | Marathi
रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा ... (2 times)
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा ....(2 times)
रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा ....
हा चंद्र ना स्वयंभू रवितेज वाहतो हा ....
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा ..... (2 times)
प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्यांचा
हा खेळ सावल्यांचा .... (2 times)
रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा
आभास सावली हा.. असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते असती नितांत भास
फसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा
या साजिर्या क्षणाला का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका
मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा
हा खेळ सावल्यांचा ... (2 times)
रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा ... (2 times)
हे सुद्धा नक्की वाचा :
- Chandra Aahe Sakshila Lyrics
- Mendichya Panavar Lyrics
- Dhund Ekant Ha Lyrics
- Sakhi Mand Zalya Tarka Lyrics
- Shabdavachun Kalale Sare Lyrics
धन्यवाद !!!!!
Post a Comment