प्रथम नमो गौतमा लिरिक्स | Pratham Namo Gautamaa Lyrics
![]() |
प्रथम नमो गौतमा लिरिक्स |
प्रथम नमू गौतमा
शांतीदूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा
प्रथम नमू गौतमा चला हो, प्रथम नमू गौतमा
तथागताची तत्त्वप्रणाली , आचरण्याची मुभा मिळाली
जीवनानंदे आज बहरली , वैशाखी पौर्णिमा
करू बुद्धमय उभ्या धरेला , बेत मनीचा नेत इरेला
रम्य चंद्रमा आज उदेला , इथेच थोडे रमा
शुद्ध शीलाचं लेऊन लेणं , बुद्धं सरणं गाऊ गाणं
करुया पावन अपुले जीवन , होऊन सारे जमा
मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण नमु गौतमा लिरिक्स (Pratham Namo Gautamaa Lyrics) बघितले. मराठी गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.
धन्यवाद !!!!!
Namo buddhay
उत्तर द्याहटवा