Header Ads

अतिशय प्रभावी असे व्यंकटेश स्तोत्र आणि त्याची विधी | Venkatesh Stotra in Marathi


नमस्कार मित्रांनो आज आपण Venkatesh Stotra in Marathi बघणार आहोत . नावाप्रमाणेच हे स्तोत्र व्यंकटेश भगवान यांना समर्पित आहे . व्यंकटेश भगवानांची अजून नावे अशा प्रकारे आहेत - श्री तिरुपती, श्री गोविंदा, श्री पेरुमल, श्री निवास. व्यंकटेश देवाची मंदिरे भारतातच नाही परदेशात पण आहे . या स्तोत्राची रचना देविदास यांनी केली आहे . भारतामध्ये अनेक चमत्कारिक आणि फलदायी मंत्र, स्तोत्र ऋषी मुनींद्वारा दिलेले आहेत . श्रद्धेने आणि विश्वासाने त्याचा पाठ केल्यास सगळ्या इच्छा पूर्ण करणारे असे हे आहेत . त्या पैकी एक व्यंकटेश स्तोत्र आहे . याचा भक्ती भावाने पाठ केल्यास आरोग्य, सुख, समृद्धी तसेच मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करण्यास हे स्तोत्र समर्थ आहे.


    Venkatesh Stotra in Marathi
    Venkatesh Stotra in Marathi

    अनेकांनी याचा अनुभव घेतला आहे आणि आपलं जीवन समृद्ध बनविलेला आहे . पण त्यासाठी यावर विश्वास असणे महत्वाचे आहे तरच तुम्हाला याचा लाभ बघायला मिळेल . व्यंकटेश स्तोत्राच्या पठणाने दुःखापासून मुक्ती होते आणि आपली संकटे पण दूर होण्यास मदद होते .कोणत्याही स्तोत्रा आणि मंत्रा मध्ये एक positve energy, एक power असते त्या मुले आपले मन शांत प्रसन्न तर बनतेच सोबतच घरातले वातावरण पण शुद्ध होते आणि नियमित किंवा व्रताप्रमाणे याचा पाठ केल्याने आपल्याला आपल्या जीवनात पण याचे सकारात्मक बदल बघायला मिळतात.

    व्यंकटेश स्तोत्राचा पाठ कसा करावा ?

    • याचा पाठ नियमित पण करू शकता किंवा मनातील कोणत्याही इच्छापूर्ती साठी व्रताप्रमाणे २१ दिवस पण याचा करू शकता .
    • २१ दिवसाच्या पाठाची सुरवात कोणत्याही दिवशी करता येऊ शकते .
    • रात्री १२ वाजता आंघोळ वगैरे करून याचे वाचन करायचे असते .
    • पूर्वेकडे तोंड करून याचे वाचन करावे .
    • पूर्ण श्रद्धेने आणि एकागतेने हे स्तोत्र वाचावे. आजूबाजूला लक्ष देऊ नये .
    • या २१ दिवसामध्ये शुद्ध सात्विक अन्न घ्यावे आणि पाच विकार काम , क्रोध लोभ , मोह अहंकार या पासून दूर राहावे म्हणजे स्तोत्राचा असर किंवा लाभ लवकर दिसतो.
    • तसेच या दिवसामध्ये काही अडथळे किंवा प्रॉब्लेम आल्यास त्याचा सामना करण्याची तयारी पण ठेवली पाहिजे .
    स्तोत्र वाचनाच्या २१ दिवसाच्या आत किंवा नंतर तुम्ही बघाल कि तुमची समस्या असेल ती दूर होण्याच्या मार्गावर असेल आणि इच्छा असेल तर ती पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागतील.
    तर तुम्ही पण या स्तोत्राचे मनोभावे वाचन करून याचा लाभ घ्यावा हीच माझी व्यंकटेश देवाच्या चरणी प्रार्थना .चला तर बघूया चमत्कारिक व्यंकटेश स्तोत्र -



    Venkatesh Stotra | Marathi


    श्रीगणेशाय नमः । श्री व्यंकटेशाय नमः ।

    ॐ नमो जी हेरंबा ।सकळादि तूं प्रारंभा ।
    आठवूनि तुझी स्वरुपशोभा । वंदन भावें करीतसे ॥ १ ॥

    नमन माझे हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी ।
    ग्रंथ वदावया निरुपणी । भावार्थखाणी जयामाजी ॥ २ ॥

    नमन माझे गुरुवर्या । प्रकाशरुपा तूं स्वामिया ।
    स्फूर्ति द्यावी ग्रंथ वदावया । जेणें श्रोतया सुख वाटे ॥ ३ ॥

    नमन माझे संतसज्जना । आणि योगियां मुनिजनां ।
    सकळ श्रोतयां सज्जना । नमन माझे साष्टांगी ॥ ४ ॥

    ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक । महादोषासी दाहक ।
    तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ॥ ५ ॥

    जयजयाजी व्यंकटरमणा । दयासागरा परिपूर्णा ।
    परंज्योति प्रकाशगहना । करितों प्रार्थना श्रवण कीजे ॥ ६॥

    जननीपरी त्वा पाळिलें । पितयापरी त्वां सांभाळिले ।
    सकळ संकटापासूनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ॥ ७ ॥

    हें अलोलिक जरी मानावें । तरी जग हें सृजिलें आघवें ।
    जनकजनीपण स्वभावें । सहज आलें अंगासी ॥ ८ ॥

    दीनानाथा प्रेमासाठी । भक्त रक्षिले संकटी ।
    प्रेम दिधलें अपूर्व गोष्टी । भजनासाठी भक्तांच्या ॥ ९ ॥

    आतां परिसावी विज्ञापना । कृपाळुवा लक्ष्मीरमणा ।
    मज घालोनी गर्भाधाना । अलौकिक रचना दाखविली ॥ १०॥

    तुज न जाणतां झालों कष्टी । आतां दृढ तुझे पायीं घातली मिठी ।
    कृपाळुवा जगजेठी । अपराध पोटीं घालीं माझें ॥ ११ ॥

    माझिया अपराधांच्या राशी । भेदोनि गेल्या गगनासी ।
    दयावंता हृषीकेशी । आपुल्या ब्रीदासी सत्य करीं ॥ १२ ॥

    पुत्राचे सहस्त्र अपराध । माता काय मानी तयाचा खेद ।
    तेवीं तू कृपाळू गोविंद । मायबाप मजलागी ॥ १३ ॥

    उदडांमाजी काळेगोरे । काय निवडावें निवडणारे ।
    कुचलिया वृक्षांची फळें । मधुर कोठोनि असतील ॥ १४ ॥

    अराटीलागीं मृदुला । कोठोनि असेल कृपावंता ।
    पाषाणासी गुल्मलता । कैसियापरी फुटतील ॥ १५ ॥

    आपादमस्तकावरी अन्यायी । परी तुझे पदरीं पडिलों पाहीं ।
    आतां रक्षण नाना उपायीं । करणें तुज उचित ॥ १६ ॥

    समर्थाचिये घरीचे श्र्वान । त्यासी सर्वही देती मान ।
    तैसा तुज म्हणवितों दीन । हा अपमान कवणाचा ॥ १७ ॥

    लक्ष्मी तुझे पायांतळी । आम्ही भिक्षेसी घालोनि झोळी ।
    येणे तुझी ब्रीदावळी । कैसी राहील गोविंदा ॥ १८ ॥

    कुबेर तुझा भांडारी । आम्हां फिरविसी दारोदारीं ।
    यांत पुरुषार्थ मुरारी । काय तुजला पैं आला ॥ १९ ॥

    द्रौपदीसी वस्त्रें अनंता । देत होतासी भाग्यवंता ।
    आम्हांलागी कृपणता । कोठोनि आणिली गोविंदा ॥ २० ॥

    मावेची करुनी द्रौपदी सती । अन्ने पुरविलीं मध्यरातीं ।
    ऋषीश्र्वरांच्या बैसल्या पंक्ती । तृप्त केल्या क्षणमात्रें ॥ २१ ॥

    अन्नासाठी दाही दिशा । आम्हा फिरविसी जगदिशा ।
    कृपाळुवा परमपुरुषा । करुणा कैसी तुज न ये ॥ २२ ॥

    अंगीकासा री या शिरोमणी । तुज प्रार्थितो मधुर वचनीं ।
    अंगीकार केलिया झणीं । मज हातीचे न सोडावें ॥ २३ ॥

    समुद्रे अंगीकारिला वडवानळ । तेणें अंतरी होतसे विव्हळ ।
    ऐसें असोनि सर्वकाळ । अंतरी सांठविला तयानें ॥ २४ ॥

    कूर्में पृथ्वीचा घेतला भार । तेणे सोडिला नाहीं बडिवार ।
    एवढा ब्रह्मांड गोळ थोर । त्याचा अंगीकार पै केला ॥ २५ ॥

    शंकरे धरिलें हाळाहळा । तेणे नीळवर्ण झाला गळा ।
    परी त्यागिले नाही गोपाळा । भक्तवत्सला गोविंदा ॥ २६ ॥

    माझ्या अपराधांच्या परी । वर्णितां शिणली वैखरी ।
    दुष्ट पतित दुराचारी । अधमाहूनि अधम ॥ २७ ॥

    विषयासक्त मंदमति आळशी । कृपण कुव्यसनी मलिन मानसीं ।
    सदा सर्वकाळ सज्जनांसी । द्रोह करी सर्वदा ॥ २८ ॥

    वचनोक्ति नाहीं मधुर । अत्यंत जनासी निष्ठुर ।
    सकळ पामरांमाजीं पामर । व्यर्थ बडिवार जगी वाजे ॥ २९ ॥

    काम क्रोध मद मत्सर । हें शरीर त्यांचे बिढार ।
    कामकल्पनेसी थोर । दृढ येथे केला असे ॥ ३० ॥

    अठरा भार वनस्पतींची लेखणी । समुद्र भरला मषीकरुनी।
    माझे अवगुण लिहितां धरणीं । तरी लिहिले न जाती गोविंदा ॥ ३१ ॥

    ऐसा पतित मी खरा । तरी तूं पतितपावन शारङ्गधरा ।
    तुवां अंगीकार केलिया गदाधरा । कोण गुणदोष गणील ॥ ३२ ॥

    नीचा रतली रायासीं । तिसी कोण म्हणेल दासी ।
    लोह लागतां परिसासी । पूर्वस्थिती मग कैंची ॥ ३३ ॥

    गांवीचे होते लेंडवोहळ । गंगेसी मिळतां गंगाजळ ।
    काकविष्ठेचे झाले पिंपळ । तयांसी निंद्य कोण म्हणे ॥ ३४ ॥

    तैसा कुजाति मी अमंगळ । परी तुझा म्हणवितो केवळ ।
    कन्या देऊनियां कुळ । मग काय विचारावे ॥ ३५ ॥

    जाणत असतां अपराधी नर । तरी कां केला अंगीकार ।
    अंगीकारावरी अव्हेर । समर्थें केला न पाहिजे ॥ ३६ ॥

    धांव पाव रे गोविंदा । हाती घेवोनिया गदा ।
    करी माझ्या कर्मांचा चेंदा । सच्चिदानंदा श्रीहरी ।।३७।।

    तुझिया नामाची अपरिमित शक्ती । तेथे माझी पापे किती ।
    कृपाळुवा लक्ष्मीपती । बरवे चित्ती विचारी ।।३८।।

    तुझे नाम पतितपावन । तुझे नाम कलिमलदहन ।
    तुझे नाम भवतारण । संकटनाशन नाम तुझे ।।३९।।

    आता प्रार्थना ऐक कमळापती । तुझे नामी राहो माझीमती मती।
    हेंची मागतो पुढत पुढती । परंज्योती व्यंकटेशा ।।४०।।

    तू अनंत तुझी अनंत नामे । तयांमाजी अति सुगमे ।
    ती मी अल्पमती प्रेमे । स्मरूनी प्रार्थना करीतसे ।। ४१।।

    श्रीव्यंकटेशा वासुदेवा । प्रद्युम्ना अनंता केशवा ।
    संकर्षणा श्रीधरा माधवा । नारायणा आदिमूर्ती ।।४२।।

    पद्मनाभा दामोदरा । प्रकाशगहना परात्परा ।
    आदि अनादि विश्वंभरा । जगदुद्धारा जगदीशा ।।४३।।

    कृष्णा विष्णो ह्रीशिकेषा । अनिरुद्धा पुरूषोतम्मा परेशा ।
    नृसिंह वामन भार्गवेशा । बौद्ध कलंकी निजमूर्ती ।। ४४।।

    अनाथरक्षका आदिपुरुषा । पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा ।
    सकळमंगळ मंगळाधीशा । सज्जनजीवना सुखमूर्ती ।।४५।।

    गुणातीता गुणज्ञा । निजबोधरूपा निमग्ना ।
    शुध्द सात्विका सुज्ञा । गुणप्राज्ञा परमेश्वरा ।।४६।।

    श्रीनिधी श्रीवत्सलांछनधरा । भयकृदभयनाशना गिरिधरा ।
    दुष्टदैत्यसंहारकरा । वीरा सुखकरा तू एक ।।४७।।

    निखिल निरंजन निर्विकारा । विवेकरवाणी वैरागरा ।
    मधुमुरदैत्यसंहारकरा । असुरमर्दना उग्रमूर्ती ।।४८।।

    शंखचक्र गदाधरा । गरुडवाहना भक्तप्रियकरा ।
    गोपीमनरंजना सुखकरा । अखंडित स्वभावे ।।४९।।

    नानानाटकसूत्रधारिया । जगद्व्यापका जगद्वर्या ।
    कृपासमुद्रा करुणालया । मुनिजनध्येया मूळमूर्ती ।।५०।।

    शेषशयना सार्वभौमा । वैकुंठवासिया निरूपमा ।
    भक्तकैवारिया गुणधाम । पाव आम्हां ये समयी ।।५१।।

    ऐसी प्रार्थना करुनि देवीदास । अंतरी आठविला श्री व्यंकटेश ।
    स्मरता ह्रिदयी प्रकटला ईश । त्या सुखासी पार नाही ।।५२।।

    ह्रिदयी आविर्भवली मूर्ती । त्या सुखाची अलौकिक स्थिती ।
    आपुले आपण श्रीपती । वाचेहाती वदवीतसे ।।५३।।

    ‘ते’ स्वरूप अत्यंत सुंदर । श्रोती श्रवण कीजे सादर ।
    सांवळी तनु सुकुमार । कुंकुमाकार पादपद्मे ।।५४।।

    सुरेख सरळ अंगोळिका । नखें जैसी चंद्ररेखा ।
    घोटीव सुनीळ अपूर्व देखा । इंद्रनिळाचियेपरी ।।५५।।

    चरणी वाळे घागरिया । वांकी वरत्या गुजरिया ।
    सरळ सुंदर पोटरिया । कर्दळीस्तंभाचियेपरी ।।५६।।

    गुडघे मांडिया जानुस्थळ । कटीतटी किंकिणी विशाळ ।
    खालते विश्वउत्पत्तिस्थळ । वरी झळाळे सोनसळा ।।५७।।

    कटीवरते नाभिस्थान । जेथोनि ब्रह्मा झाला उत्पन्न ।
    उदरी त्रिवळी शोभे गहन । त्रैलोक्य संपूर्ण जयामाजी ।।५८।।

    वक्ष:स्थळी शोभे पदक । पाहोनि चंद्रमा अधोमुख ।
    वैजयंती करी लखलख । विद्युल्लतेचियेपरी ।।५९||

    ह्रिदयी श्रीवत्सलांछन । भूषण मिरवी श्रीभगवान ।
    तयावरते कंठस्थान । जयासी मुनिजन अवलोकिती ।।६०।।

    उभय बाहुदंड सरळ ।नखें चंद्रापरीस तेजाळ ।
    शोभती दोन्ही करकमळ । रातोत्पलाचीयेपरी ।।६१।।

    मनगटी विराजती कंकणे । बाहुवटी बाहुभूषणे ।
    कंठी लेइली आभरणे । सूर्यकिरणे उगवली ।।६२।।

    कंठावरुते मुखकमळ । हनुवटी अत्यंत सुनीळ ।
    मुखचंद्रमा अतिनिर्मळ । भक्तस्नेहाळ गोविंदा ।।६३।।

    दोन्ही अधरांमाजी दंतपंक्ती । जिव्हा जैसी लावण्यज्योती ।
    अधरामृतप्राप्तीची गती । ते सुख जाणे लक्ष्मी ।।६४।।

    सरळ सुंदर नासिक । जेथे पवनासी झाले सुख ।
    गंडस्थळीचे तेज अधिक । लखलखीत दोहीं भागी ।।६५।।

    त्रिभुवनीचे तेज एकवटले । बरवेपण सिगेसि आले ।
    दोन्ही पातयांनी धरिले । तेच नेत्र श्रीहरीचे ।।६६।।

    व्यंकटा भृकुटिया सुनीळा । कर्णद्वयाची अभिनव लीळा ।
    कुंडलांच्या फांकती कळा । तो सुखसोहळा अलौकिक ।।६७।।

    भाळ विशाळ सुरेख । वरती शोभे कस्तुरीटिळक ।
    केश कुरळे अलौकिक । मस्तकावरी शोभती ।।६८।।

    मस्तकी मुकुट आणि किरीटी । सभोवती झिळमिळ्याची दाटी ।
    त्यावरी मयूरपिच्छांची वेटी । ऐसा जगजेठी देखिला ।।६९।।

    ऐसा तू देवाधिदेव । गुणातीत वासुदेव ।
    माझिया भक्तीस्तव । सगुणरूप झालासी ।।७०।।

    आतां करू तुझी पूजा । जगज्जीवना अधोक्षजा ।
    आर्ष भावार्थ हा माझा । तुज अर्पण केला असे ।।७१।।

    करूनि पंचामृतस्नान । शुद्धामृत वरी घालून ।
    तुज करू मंगलस्नान । पुरुषसूक्तेकरूनियां ।।७२।।

    वस्त्रे आणि यज्ञोपवीत । तुजलागी करू प्रीत्यर्थ ।
    गांधाक्षता पुष्पे बहुत । तुजलागी समर्पू ।।७३।।

    धूप दीप नैवेद्य । फल तांबूल दक्षिणा शुद्ध ।
    वस्त्रे भूषणे गोमेद । पद्मरागादिकरुनी ।।७४।।

    भक्तवत्सला गोविंदा । ही पूजा अंगीकारावी परमानंदा ।
    नमस्कारुनी पादारविंदा । मग प्रदक्षिणा आरंभिली ।।७५।।

    ऐसा षोडशोपचारे भगवंत । यथाविधि पूजिला हृदयांत ।
    मग प्रार्थना आरंभिली बहुत । वरप्रसाद मागावया ।।७६।।

    जयजयाजी श्रुतिशास्त्रआगमा । जयजयाजी गुणातीत परब्रह्मा ।
    जयजयाजी हृदयवासिया रामा । जगदुद्धारा जगद्गुरू ।।७७।।

    जयजयाजी पंकजाक्षा । जयजयाजी कामळाधीशा ।
    जयजयाजी पूर्णपरेशा । अव्यक्तवक्ता सुखमुर्ती ।।७८।।

    जयजयाजी भक्तरक्षका । जयजयाजी वैकुंठनायका ।
    जयजयाजी जगपालका । भक्तांसी सखा तू एक ।।७९।।

    जयजयाजी निरंजना । जयजयाजी परात्परगहना ।
    जयजयाजी शुन्यातीत निर्गुणा । परिसावी विज्ञापन एक माझी ।।८०।।

    मजलागी देई ऐसा वर । जेणें घडेल परोपकार ।
    हेंचि मागणे साचार । वारंवार प्रार्थीतसे ।।८१।।

    हा ग्रंथ जो पठण करी । त्यासी दु:ख नसे संसारी ।
    पठणमात्रे चराचरी ।विजयी करी जगाते ।।८२।।

    लाग्नार्थियाचे व्हावें लग्न । धनार्थीयासी व्हावें धन ।
    पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण । पुत्र देऊनि करावे ।।८३।।

    पुत्र विजयी आणि पंडित । शतायुषी भाग्यवंत ।
    पितृसेवेसी अत्यंत रत । जयाचे चित्त सर्वकाळ ।।८४।।

    उदार आणि सर्वज्ञ । पुत्र देई भक्तालागून ।
    व्याधिष्ठांची पीडा हरण । तत्काळ कीजे गोविंदा ।।८५।।

    क्षय अपस्मार कुष्ठादि रोग । ग्रंथपठणे सरावा भोग ।
    योगाभ्यासियासी योग । पठणमात्रे साधावा ।।८६।।

    दरिद्री व्हावा भाग्यवंत । शत्रूचा व्हावा नि:पात ।
    सभा व्हावी वश समस्त । ग्रंथपठणेकरुनिया ।।८७।।

    विद्यार्थियासी विद्या व्हावी । युद्धी शस्त्रे न लागावी ।
    पठणे जगात कीर्ति व्हावी । साधु साधु म्हणोनिया ।।८८।।

    अती व्हावे मोक्षसाधन । ऐसे प्रार्थनेसी दीजे मन ।
    एवढे मागतो वरदान । कृपानिधे गोविंदा ।।८९।।

    प्रसन्न झाला व्यंकटरमण । देवीदासासी दिधले वरदान ।
    ग्रंथाक्षरी माझे वचन । यथार्थ जाण निश्चयेसी ।।९०।।

    ग्रंथी धरोनि विश्वास । पठण करील रात्रंदिवस ।
    त्यालागी मी जगदीश । क्षण एक न विसंबे ।।९१।।

    इच्छा धरोनि करील पठण । त्याचे सांगतो मी प्रमाण ।
    सर्व कामनेसी साधन । पठण एक मंडळ ।।९२।।

    पुत्रार्थियाने तीन मास । धनार्थियाने एकवीस दिवस ।
    कन्यार्थियाने षण्मास । ग्रंथ आदरे वाचवा ।।९३।।

    क्षय अपस्मार कुष्टादि रोग । इत्यादि साधने प्रयोग ।
    त्यासी एक मंडळ सांग । पठणेकरूनि कार्यसिद्धी ।।९४।।

    हे वाक्य माझे नेमस्त । ऐसे बोलिला श्रीभगवंत ।
    साच न मानी जयाचे चित्त । त्यासी अध:पात सत्य होय ।।९५।।

    विश्वास धरील ग्रंथपठणी । त्यासी कृपा करील चक्रपाणी ।
    वर दिधला कृपा करुनी । अनुभवे कळो येईल ।।९६।।

    गजेन्द्राचिया आकांतासी । कैसा पावला हृषीकेशी ।
    प्रल्हादाचिया भावार्थासी । स्तंभातूनी प्रगटला ।।९७।।

    वज्रासाठी गोविंदा । गोवर्धन परमानंदा ।
    उचलोनिया स्वानंदकंदा । सुखी केले तये वेळी ।।९८।।


    वत्साचे परी भक्तांसी । मोहे पान्हावे धेनु जैसी ।
    मातेच्या स्नेह्तुलनेसी । त्याचपरी घडलेसे ।।९९।।

    ऐसा तू माझा दातार । भक्तांसी घालिसी कृपेची पाखर ।
    हा तयाचा निर्धार । अनाथनाथ नाम तुझे ।।१००।।

    श्रीचैतन्यकृपा अलोकिक । संतोषोनि वैकुंठनायक ।
    वर दिधला अलोकिक । जेणे सुख सकळांसी ।।१०१।।

    हा ग्रंथ लिहिता गोविंद । या वचनी न धरावा भेद ।
    हृदयी वसे परमानंद । अनुभवसिद्ध सकळांसी ।।१०२।।

    या ग्रंथीचा इतिहास । भावें बोलिला विष्णुदास ।
    आणिक न लागती सायास । पठणमात्रे कार्यसिद्धी ।।१०३।।

    पार्वतीस उपदेशी कैलासनायक । पूर्णानंद प्रेमसुख ।
    त्याचा पार न जाणती ब्राह्मादिक । मुनि सुरवर विस्मित ।।१०४।।

    प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी । त्रैलोक्य भजत त्रिकाळी ।
    ध्याती योगी आणि चंद्रमौळी । शेषाद्रीपर्वती उभा असे ।।१०५।।

    देवीदास विनवी श्रोतयां चतुरां । प्रार्थनाशतक पठण करा ।
    जावया मोक्षाचिया मंदिरा । काहीं न लागती सायास ।।१०६।।


    एकाग्रचित्ते एकांती । अनुष्ठान कीजे मध्यराती ।
    बैसोनिया स्वस्थचित्ती । प्रत्यक्ष मूर्ति प्रगटेल ।।१०७।।

    तेथें देह्भावासी नुरे ठाव । अवघा चतुर्भुज देव ।
    त्याचे चरणी ठेवोनि भाव । वरप्रसाद मागावा ।।१०८।।

    इति श्रीदेवीदासविरचितं श्रीव्यंकटेशस्तोत्रं संपूर्णम 

    ।।श्री व्यंकटेशार्पणमस्तु ।।



    Venkatesh Stotra | Sanskrit



    वेंकटेशो वासुदेवः प्रद्युमनोमितविक्रमहा |
    संकर्षनो निरुद्धश्र्व शेषद्विपतीरेव च || १ ||

    जनार्दनाः पदमनाभो वेंककटाचलावासनहा |
    सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलहा || २ ||

    गोविंदो गोपति कृष्णाहा केशवो गरुडध्वजहा |
    वराहोवामानश्राइव नारायण अधोक्षजहा || ३ ||

    श्रीधरा पुंडरीकाक्षहा सर्वदेवस्तुतो हरिहा |
    नृसिहो महासिंहा सूत्रकारः पुरातनः || ४ ||

    रामनाथो महिभरता भूधरः पुरूषोत्तमहा |
    चोळपुत्रप्रिय शांतो ब्रम्हादिना वरप्रदः || ५ ||

    श्रीनिधी सर्वभूतांना भयकदधनाशनाः |
    श्रीरामो रामभद्रश्र्व भावबंधहईकमोचकः || ६ ||

    भुतावासो गिरवसः श्रीनिवासः श्रेयःपतीही |
    अच्यतानंतगोविंदो भवबंधैकमोचकः || ७ ||

    सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदेवतम |
    समस्तदेवकवचम सर्वदेवशिखामनीही || ८ ||

    इतिदि कीर्तितं यस्य विष्णो रमीत तेजसहः |
    त्रिकाले यः पठेनित्यं पापं तस्य न विद्यते || ९ ||

    राज द्वारे पठेद्धहोरे संग्राम रिपुसंकटे |
    भूत सर्प पिशाचदिभयं नास्ती कदाचन || १० ||

    अपुत्रो लाभते पुत्रान निर्धनो धनवानभवेत |
    रोगरतो मुच्यते बद्धहो मुच्येत बंधनात || ११ ||

    यद्यस्थितमम् लोकी तात्त त्प्राप्नोत्यसंशयः |
    एश्वर्यम राजसम्मानं भक्तीमुक्तीफलप्रदम || १२ ||

    विष्णो लोकेकसोपानम सर्व दुखैक नाशनम |
    सर्वेश्वर्यप्रदं नृनां सर्वमंगलकारकम || १३ ||

    मायावी परमानंदम त्यक्त्वा वैकुंठामूत्तमम |
    स्वामी पुष्करिणितीरे रमया सह मोदते || १४ ||

    कल्याणादभुगात्राय कामितार्थ प्रदियन
    श्रीमदवेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः | | १५ ||


    || इति श्री वेंकटेश स्तोत्रम संपुर्णम ||




    आज आपण Venkatesh Stotra in Marathi बद्दल जाणून घेतलं . कोणत्याही स्रोचा मनःपूर्वक पाठ केल्याने त्याचा फायदा हा नक्की होत असतो . तुमचे काही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा आणि अश्याच भक्ती संबंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

    हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!!!!!!!!!!



    हे सुद्धा नक्की वाचा 👇👇👇




    १५ टिप्पण्या:

    1. हे स्तोत्र वाचताना 21 दिवस उपवास करावा लागतो काय? वयोवृद्ध व्यक्तीना हे कसे जमेल?

      उत्तर द्याहटवा
    2. नाही. 21 दिवस उपवास केला पाहिजे असा कही नियम नाही . आपण या काळात सात्विक अन्न घेण्याचा प्रयत्न करवा .

      उत्तर द्याहटवा
    3. गरोदर महिलांना चालते का पठाण करायला दिवसा पारायण करू शकतो का

      उत्तर द्याहटवा
    4. गरोदर महिला या स्तोत्राचे पठन करू शकतात तसेच महिला पुरुष कोणीही याचे पठन करू शकतात. हे स्तोत्र मध्यरात्रि करण्याचाच नियम आहे . म्हणून लवकर इच्छापूर्तीसाठी तुम्ही ते मध्यरात्रि १२ वाजता करणे उत्तम राहील .

      उत्तर द्याहटवा
    5. The sanskrit stotra is 15 stanzas but marathi stotra is 108? Is this not a translation of Sanskrit Stotra? Could you please share the sanskrit stotra which has corresponding 108 shlokas with marathi shlokas?

      उत्तर द्याहटवा
    6. Thank You for your reply....Yes... In Marathi stotra there is lots more stanzas than Sanskrit. Sanskrit stotra is taken from BramhaandPurana which is conversation between Brmhaa and Naarad. Where as Marathi stotra is written by Devidaas which describes the greatness of Vishnu. But you can read any of this, it will be equally beneficial. Your belief and faith is very much important. In the post below I am posting stotra in Sansrit.

      उत्तर द्याहटवा
      प्रत्युत्तरे
      1. Thanks. Please post the sanskrit stotra.
        Also, is it correct to assume that the marathi stotra is not a translation of sanskrit stotra but it is originally written (virachit) in marathi by Devidas? So technically both are different in content (meaning, Sanskrit has bhakti and falashruti where as marathi is more of a story and shri vayankatesh stuti) but the intent of both is the same (that is to praise lord shri vyankatesh and yachana of benefits of reciting the stotra.

        हटवा
      2. I did brief research. But I couldn't find the difference between two. If you got any information regarding this please share with everyone....

        हटवा
    7. प्रत्युत्तरे
      1. एका वेळेला स्तोत्राचे २१ वेळा पठण करणे म्हणजे १ मंडळ. असे रोज एक मंडळ म्हणजे रोज २१ वेळा आणि असे २१ दिवस याचा पाठ करायचा असतो.

        हटवा
    8. Kay Kay niyam palave lagata hey brat karnyassthi
      Roj ek vela vachave ka? 21 diwas paryant

      उत्तर द्याहटवा
      प्रत्युत्तरे
      1. नियम आणि अधीक सविस्तर माहितीसाठी मी पोस्टच्या शेवटी एक विडिओ शेअर करत आहे. तो तुम्ही जरूर बघा म्हणजे तुमच्या सर्व शंका दूर होतील.

        हटवा

    Blogger द्वारे प्रायोजित.