लोकमान्य टिळक यांची माहिती 10 ओळी | LokmanyaTilak Nibandh Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये लोकमान्य टिळक यांची माहिती 10 ओळी बघणार आहोत.
________________
👶लहान मुलांसाठी – लोकमान्य टिळक यांची माहिती 10 ओळी
1) लोकमान्य टिळक हे महान स्वातंत्र्यसैनिक होते.
2) त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते.
3) त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला.
4) ते एक विद्वान शिक्षक आणि समाजसुधारक होते.
5) त्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू केला.
6) त्यांनी शिवजयंती उत्सवही सुरू केला.
7) "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हा त्यांचा प्रसिद्ध विचार आहे.
8) त्यांनी देशभक्तीची भावना जागृत केली.
9) भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.
10) लोकमान्य टिळक हे आपल्या देशाचे प्रेरणास्थान आहेत.
_________________
👦मोठ्या मुलांसाठी – लोकमान्य टिळक यांची माहिती 10 ओळी
1) लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेते, समाजसुधारक आणि पत्रकार होते.
2) त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असून त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला.
3) त्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि राष्ट्रीय जागृतीसाठी मोठे कार्य केले.
4) त्यांनी 'केसरी' (मराठी) आणि 'मराठा' (इंग्रजी) ही वृत्तपत्रे सुरू केली.
5) सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून त्यांनी जनतेमध्ये राष्ट्रप्रेम जागृत केले.
6) "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा त्यांचा अमर संदेश आजही प्रेरणादायी आहे.
7) त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवला आणि अनेकदा तुरुंगवासही भोगला.
8) त्यांच्या विचारांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा आणि बळ मिळाले.
9) त्यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले, परंतु त्यांचे कार्य आजही देशवासीयांना प्रेरणा देते.
10) लोकमान्य टिळक हे भारतीय इतिहासातील एक महान राष्ट्रनेते म्हणून सदैव स्मरणात राहतील.
________________
________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण लोकमान्य टिळक यांची माहिती 10 ओळी बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
________________
Post a Comment