दिवाळी निबंध 10 ओळी | Diwali Nibandh Daha Oli | Marathi Nibandh
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये दिवाळी निबंध 10 ओळी बघणार आहोत.
__________________
लहान मुलांसाठी – दिवाळी निबंध 10 ओळी
1) दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे.
2) हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
3) दिवाळीत घरे स्वच्छ करून सजवली जातात.
4) घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते.
5) रात्री दिवे आणि पणत्यांनी घर उजळते.
6) आम्ही नवीन कपडे घालतो.
7) दिवाळीत गोड पदार्थ आणि फराळ बनवला जातो.
8) आम्ही कुटुंबासोबत सणाचा आनंद घेतो.
9) फटाके कमी फोडून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.
10) दिवाळी हा माझा आवडता सण आहे.
__________________
मोठ्या मुलांसाठी – दिवाळी निबंध 10 ओळी
1) दिवाळी हा भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा सण मानला जातो.
2) हा सण अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
3) दिवाळीपूर्वी घरे स्वच्छ करून रंगरंगोटी व सजावट केली जाते.
4) घरासमोर आकर्षक रांगोळी काढून दिवे आणि पणत्या लावल्या जातात.
5) या सणात लक्ष्मीपूजन, भाऊबीज, नरक चतुर्दशी आणि पाडवा असे विविध सण साजरे केले जातात.
6) दिवाळीत चकली, करंजी, लाडू, शेव यांसारखे स्वादिष्ट फराळाचे पदार्थ तयार केले जातात.
7) नातेवाईक आणि मित्रांना शुभेच्छा देऊन भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते.
8) फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी.
9) दिवाळी आपल्याला प्रेम, ऐक्य, आनंद आणि वाटून घेण्याचा संदेश देते.
10) म्हणूनच दिवाळी हा माझा सर्वात आवडता आणि आनंददायी सण आहे.
__________________
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण दिवाळी निबंध 10 ओळी बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
__________________
Post a Comment