Header Ads

आम्ही हरिचे सवंगडे अभंग Lyrics । Amhi Hariche Savangade Abhang



नमस्कार,स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!!!!!! आज या पोस्ट मध्ये आम्ही हरिचे सवंगडे अभंग Lyrics बघणार आहोत.

आम्ही हरिचे सवंगडे अभंग Lyrics । Marathi

आम्ही हरिचे सवंगडे । जुने ठायीचे वेडे बागडे ।
हाती धरुनी कडे । पाठीसवे वागविलो ॥१॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥

निद्रा करिता होतो पायी । सवे चि लंका घेतली तई ।
वानरे गोवळ गाई । सवे चारित फिरतसो ॥२॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ 

आम्हा नामाचे चिंतन । राम कृष्ण नारायण।
तुका म्हणे क्षण । खाता जेविता न विसंभो ॥३॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥

* * * * *



हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज या पोस्ट मध्ये आपण आम्ही हरिचे सवंगडे अभंग Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.