घे ओळखून राधे मला गवळण | Ghe Olakhun Radhe Mala Gavlan Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण घे ओळखून राधे मला गवळण ही खूपच सुंदर गवळण बघणार आहोत.
घे ओळखून राधे मला गवळण | Marathi
घे ओळखून राधे मला |
मी ग आलो तुझ्या भेटीला || धृ ||
राम अवतारी वधीलो रावण |
संगे घेऊन बंधू लक्ष्मण ||
माझ्या भक्तीत आहे हनुमान |
लंका हाती मी दिलं विभीषण ||
म्हणून, घे ओळखून राधे मला |
मी ग आलो तुझ्या भेटीला || १ ||
आठवा अवतार धरीलो लोक मी श्रीकृष्ण |
मारीयलो कौस्तु महा दुर्जन ||
माझ्या भक्तीत आहे अर्जुन |
की त्याचे ज्ञान मी दिलं रणांगण ||
घे ओळखून राधे मला |
मी ग आलो तुझ्या भेटीला || २ ||
माझी लीला आहे न्यारी |
अवतार घेतील युगायुगापरी ||
माझा भक्त पुंडलिक आहे भारी |
त्याने मला उभे केले विटेवरी ||
घे ओळखून राधे मला |
मी ग आलो तुझ्या भेटीला || ३ ||
एका जनार्दनी सांगतो मी तुजला |
माझा महिमा कळेना कुणाला ||
साऱ्या विश्वात मीच भरीयला |
भक्ती रुपाने मी अवतरला ||
म्हणून राधे, घे ओळखून राधे मला |
मी ग आलो तुझ्या भेटीला || ४ ||
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
या पोस्टमध्ये आपण घे ओळखून राधे मला गवळण बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!
Post a Comment