Header Ads

सुंदर माझे जाते ग फिरते बहुत Lyrics | Sundar Majhe Jate Ga Firate Bahut Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण सुंदर माझे जाते ग फिरते बहुत Lyrics बघणार आहोत.

सुंदर माझे जाते ग फिरते बहुत Lyrics 

| Marathi

सुंदर माझे जाते ग |
फिरते बहुत ग ||
ओव्या गाऊ कौतुके |
तू येरे बा विठ्ठला || १ ||

जीव शिव दोन्ही खुंटे ग |
प्रपंचाचे नेटे ग ||
लावूनी पाची बोटे |
तू येरे बा विठ्ठला || २ ||

सासू आणि सासरा |
दिर तो तिसरा ||
ओव्या गाऊ भ्रतारा |
तू येरे बा विठ्ठला || ३ ||

बारा सोळा अवघ्या कामिनी |
ओव्या गाऊ बैसूनी||
तू येरे बा विठ्ठला || ४ ||

प्रपंच दळण दळीले |
पीठ भरीले ||
सासू पुढे ठेविले |
तू येरे बा विठ्ठला || ५ ||

सत्वाचे आधन ठेविले |
पुण्य वेरीले ||
पाप उतू गेले |
तू येरे बा विठ्ठला || ६ ||

जनी जाते गाईल |
कीर्ती राहील ||
थोडासा लाभ होईल |
तू येरे बा विठ्ठला || ७ ||

सुंदर माझे जाते ग |
फिरते बहुत ग ||
ओव्या गाऊ कौतुके |
तू येरे बा विठ्ठला ||

* * * * *



हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज या पोस्टमध्ये आपण सुंदर माझे जाते ग फिरते बहुत Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.