लाजली कृष्णाला राधा लाजली Lyrics | Lajali Krishnala Radha Lajali Gavlan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण लाजली कृष्णाला राधा लाजली Lyrics बघणार आहोत. हे राधा कृष्णाचे एक सुंदर गवळण आहे.
लाजली कृष्णाला राधा लाजली Lyrics
लाजली कृष्णाला राधा लाजली |
त्याने केली कला अशी दावली लीला ||
त्याच्या मुरलीची गोडी लागली || धृ ||
आली राधा आली |
चोर पावलाने लपून आली ||
वृंदावनी त्या कळंभा खाली |
नाही कळल्या कोणाच्या खाणा खुणा ||
राधा कृष्णाची जोडी जमली || १ ||
झाला अहो झाला |
साऱ्या गोकुळात बोलवाला ||
कृष्णानं केला गोपाळकाला |
काल दुपारी यमुनेच्या तीरी|
श्रीहरीची बासरी वाजली || २ ||
केली अहो केली |
कशी उत्तम ही कमाल केली ||
राधा गवळ्या बोलून गेली |
भावभक्ती करी राधेच्या उरी |
अशी प्रीतही जगानं गाजली || ३ ||
* * * * *
हे पण वाचा 👇👇👇
- उभी ती अनयाची राधा Lyrics
- अरे कान्हा कृष्ण मुरारी गवळण Lyrics
- राधा ग राधा ग निघाली पाण्याला Lyrics
- गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो गवळण Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण लाजली कृष्णाला राधा लाजली Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
Post a Comment