Header Ads

विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर अभंग Lyrics | Vishrantiche Sthan Santanche Maher Abhang


नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर अभंग Lyrics बघणार आहोत.

विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर अभंग Lyrics

विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर |
ते या भूमीवर अलंकापुर || धृ ||

ते स्थळी माझा जीवाचा वो ठेवा |
नमीन ज्ञानदेवा जाऊनीया या ||
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर |
ते या भूमीवर अलंकापुर || १ ||

सिद्धेश्वर स्थान दरशने मुक्ती |
ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर ||
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर |
ते या भूमीवर अलंकापुर || २ ||

चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा |
प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष ||
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर |
ते या भूमीवर अलंकापुर || ३ ||

तयासी नित्यता घडता प्रदक्षणा |
नाही म पार पुण्या वास स्वर्गी ||
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर |
ते या भूमीवर अलंकापुर || ४ ||

अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी |
भागीरथी आदी करूनी तीर्थराज ||
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर |
ते या भूमीवर अलंकापुर || ५ ||

- संत एकनाथ महाराज

* * * *




हे पण नक्की वाचा 👇👇👇👇



आज आपण विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर अभंग Lyrics बघितले.

Post पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.